गोंदिया,
दि.14 : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने माती व पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा
("Save Soil, Save Water, Secure Tomorrow )" या विषयावर राज्यस्तरीय
इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 30 वयोगटातील तरुणांना
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी 30 ते 60 सेकंदांची रील
तयार करून ती 15 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम
अकाउंटवर अपलोड करावी लागेल. रील पोस्ट करताना #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग
वापरणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे
अनिवार्य आहे.
सहभागासाठी QR कोड स्कॅन करून नोंदणी → Reel Link Submit → जिल्हा निवड → Verification → सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया
पूर्ण करावी लागेल. इन्स्टाग्रामवरील पोस्टसोबत स्वतंत्र डिजिटल नोंदणी केल्यामुळे
शासनाकडे प्रत्येक सहभागीची अधिकृत नोंद उपलब्ध राहणार आहे.
प्रत्येक सहभागीला जास्तीत जास्त तीन रील
अपलोड करता येणार असून, उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन रीलना शासनाकडून प्रशस्तीपत्र देऊन
गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन माती व पाणी
संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment