गोंदिया, दि. 3: महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांनी एकत्रितपणे प्रगती साधली असून योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळत आहे.
जिल्ह्यातील एकूण 30,295 कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 21,616 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 15,724 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून उर्वरित 5,892 प्रमाणीकरणाची कार्यवाही सुरू आहे.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी, तसेच एकवेळ समझोता (OTS) व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यात येत आहे.
*ठळक आकडेवारी*
अपलोड कर्जखाती : 30,295
पात्र शेतकरी : 21,616
ई-केवायसी पूर्ण : 15,724
प्रलंबित ई-केवायसी : 5,892
*प्रशासनाचे आवाहन*
जिल्हा प्रशासनाने प्रलंबित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण (E-KYC) पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. कारण कर्जमाफीचा लाभ थेट खात्यात जमा होण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
राज्य शासनानेही या योजनेत आधार पडताळणी अनिवार्य केली असून पात्र शेतकऱ्यांना कोणताही लाभ वंचित राहू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
0000000
No comments:
Post a Comment