गोंदिया, दि.5 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यात ई-केवायसी
(e-KYC) प्रक्रियेला वेग मिळत असून आतापर्यंत 80 टक्के प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
दिनांक 5 ऑगस्टपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार,
एकूण 20,915 कर्जखाते अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 18,830 शेतकरी पात्र ठरले
आहेत. यापैकी 14,965 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित 3,865
प्रकरणांवर वेगाने कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची
शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्या पात्र शेतकऱ्यांचे
मोबाईल नंबर आधारशी रजिस्टर्ड नाहीत त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत
बँकांना माहिती देवून सदर प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. तसेच जे शेतकरी बाहेरगावी
गेलेले आहेत त्यांनी आपली ई-केवायसी व
ॲग्रीस्टॅक ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ वेळेवर उपलब्ध होण्यास
मदत होईल. ज्या पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक या दोन्ही प्रक्रिया
पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार
आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
00000000
No comments:
Post a Comment