गोंदिया, दि.5 : गोरेगाव तालुक्यात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला 10 ऑगस्ट 2026 रोजी
दुपारी 2.30 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम तहसिलदार गोरेगाव यांचे अध्यक्षतेखाली, तहसिल
कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनानिमित्ताने तहसिलदार
यांचेकडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी एैकून घेण्यात येतील आणि शासनाच्या
विविध विभागाचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही
करण्याचे निर्देश देण्यात येतील. तरी गोरेगाव
तालुक्यातील जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी असल्यास प्रपत्र-1 (अ) मध्ये
विहीत केलेल्या अर्जामध्ये लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन गोरेगाव तहसिलदार प्रज्ञा भोकरे यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment