गोंदिया, दि.7 : जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथील सर्व न्यायाधीश व जिल्हा वकील
संघ तसेच गोंदिया जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने
दि.8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता एम.डब्ल्यु. चांदवाणी, पालक न्यायमूर्ती
नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नविन न्यायालय व जिल्हा वकील संघाच्या बार रुमचे
उद्घाटन होणार आहे.
तसेच पालावरची शाळा कुडवा, स्व.
जमनाबाई निवासी मतीमंद मुला-मुलींची शाळा उमरी/सावरटोला, ता. अर्जुनी मोरगाव व
मानवता मतीमंद मुलांची निवासी शाळा खोगरला, ता. आमगाव यांना मदतीचे साहित्य वितरण करण्यासाठी
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,
गोंदिया यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment