गोंदिया, दि.11 : किमान आधारभूत किंमत
खरेदी योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या धान खरेदीचे चुकारे (पैसे) विहित
मुदतीत अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पणन हंगाम
2026-27 पासून योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट त्यांच्या आधार
क्रमांकाशी संलग्न (Aadhaar Seeded) असलेल्या बँक खात्यातच रक्कम जमा केली जाणार
आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभागाने एनपीसीआय (NPCI) कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशा शेतकऱ्यांची यादी
तयार केली आहे, ज्या शेतकऱ्यांची बँक खाती अद्याप आधार कार्डशी संलग्न झालेली
नाहीत. अशा शेतकऱ्यांची यादी गोंदिया जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (Gondia
District Official Website) शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ही यादी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या
माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तरी संबंधित शेतकऱ्यांनी गोंदिया
जिल्ह्याच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपले नाव तपासावे व आपले बँक खाते त्वरित आधार
क्रमाकांशी संलग्न (Adhaar Link) करुन घ्यावे, जेणेकरुन धान खरेदीचे चुकारे
मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाहो. असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश
पाटील यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment