जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 7 August 2026

शासकीय वसतीगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 


            गोंदिया, दि.7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागांतर्गत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या 5 ऑगस्ट 2026 च्या परिपत्रकान्वये शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 या सत्रापासून राबविण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण 08 शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता 755 विद्यार्थी इतकी आहे. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

          सन 2026-27 करीता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणार आहेत. बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाकरीता वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करावयाचा दिनांक 7 ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. प्रवेश प्रक्रिया अंतिम करावयाचा दिनांक 22 सप्टेंबर 2026 आहे.

          अधिक माहितीकरीता विद्यार्थी व पालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment