जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 12 August 2026

गोंदियातील 11,617 शेतकऱ्यांच्या खात्यात 68 कोटींहून अधिक कर्जमुक्तीची रक्कम जमा

 



गोंदिया, दि. 12 ऑगस्ट 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11,617 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आज एकूण ₹68 कोटी 21 लाख 93 हजार 167 रुपयांचा निधी जमा करण्यात आला.

या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी आवाहन

ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी येणाऱ्या अडचणींबाबत ऑनलाइन तक्रारी DLCTLC समितीकडे नोंदवाव्यात.

तसेच ऑफलाइन तक्रारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गोंदिया तसेच जिल्ह्यातील संबंधित सहाय्यक निबंधक/सहकारी अधिकारी (श्रेणी-1) यांच्या कार्यालयात सादर कराव्यात.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था योगेशकुमार बाकरे यांनी पात्र शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या या योजनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

#Gondia #FarmerLoanWaiver #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरी #कृषी #महाराष्ट्र

No comments:

Post a Comment