गोंदिया, दि.10 :
प्रत्येक वर्षी राज्यातील अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहित) 100
विद्यार्थ्यांना देशातील भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या
http://mhrd.gov.in/institutions या संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त AIIMS, IIM,
IIT, IIITS, NIT, IISC & IISER, Institution of National Importance &
Other Colleges तसेच शैक्षणिक संस्थांच्या इतर शाखा/उपशाखा असल्यास तसेच भविष्यात
सदर शैक्षणिक संस्थांच्या इतर शाखा/उपशाखा निर्माण झाल्यास त्यामध्ये प्रवेश
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सदरहु योजना लागू राहिल. या नामांकित संस्थामधील
पदवी/पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका (आय.आय.टी. मधील प्रिपरेटरी कोर्स वगळून)
पुर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान
करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार सन 2026-27 या शैक्षणिक
वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहित) विद्यार्थ्यांकडून दि.4 सप्टेंबर
2026 सायंकाळी 6.15 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
निकषाप्रमाणे
अटी व शर्ती : या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थी
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील
रहिवाशी असावा. विद्यार्थ्यांने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य
शासनाच्या किंवा इतर राज्याच्या/केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला
नसावा. तसेच पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना
पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर
राज्याच्या/केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. या शिष्यवृत्तीसाठी
विहीत केलेल्या विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्णवेळ
विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल
वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30
वर्षे इतकी राहील. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या
कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणारे सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे वार्षिक उत्पन्न 6.00
लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे पालक नोकरीत असतील तर त्यांचे आयकर
विवरणपत्र, फॉर्म नं.16 व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार) यांनी
दिलेले मागील अर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी
(तहसिलदार किंवा नायब तहसिलदार) यांनी दिलेले मागील अर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व
मार्गानी मिळणान्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
शैक्षणिक
अर्हता : या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र
राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य
क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून इयत्ता 10 वी व 12 वीची परीक्षा उत्तीर्ण होणे
आवश्यक आहे. सदर योजनेंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी
विद्यार्थ्यांचे इयत्ता 12 वीच्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड
करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांने इयत्ता 12 वीच्या परीक्षेत किमान 55% गुण
मिळविणे आवश्यक राहील.
तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय
वर्षात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परिक्षेतील
गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्याने
डिप्लोमाच्या परिक्षेत किमान 55% गुण मिळविणे आवश्यक राहील.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या
शिष्यवृत्तीकरीता पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे
निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांने पदवी परीक्षेमध्ये किमान 55% गुण
मिळविणे आवश्यक राहील. तसेच, CGPA व GPA च्या बाबतीत संबंधित विद्यापीठाचे
टक्केवारी रुपांतरण प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
संबंधित अर्जदार विद्यार्थी हा या
योजनेअंतर्गत विहीत केलेल्या संस्थांमध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर
पदविका या अभ्यासक्रमांसाठी त्या त्या संस्थांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन
प्रवेशित झालेला असावा.
अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाचे
संकेतस्थळ www.maharashtra.gov.in (ताज्या घडामोडी) या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन
तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि.4 सप्टेंबर 2026 पूर्वी आयुक्त, समाज
कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ, पुणे-411001 यांचे कार्यालयात सादर करावा.
गोंदिया जिल्ह्यातील ज्या
विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी
प्रवेश घेतलेला आहे त्यांनी या योजनेकरीता आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज
कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment