गोंदिया, दि.6 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील
पुरस्कार प्राप्त विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी
क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक
क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक
आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा
स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना अशा कार्याबद्दल तसेच
वर्ष 2025-26 मध्ये दहावी बोर्डाच्या
परीक्षेत 90% तसेच बारावीत 85% व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या माजी
सैनिक/पत्नी/माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार स्वरुपात 25 हजार रुपये देवून
सन्मानीत करण्यात येते. तसेच IIT, IIM, AIIMS, IISER आणि IBM अशा नामवंत व ख्यातीप्राप्त
संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवा यांच्या
पाल्यांना 1 लाख रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येते.
तरी ज्या माजी सैनिक/पत्नी/माजी
सैनिकांच्या पाल्यास शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता दहावीत 90% व बारावीत 85% पेक्षा
अधिक गुण मिळाले असतील आणि IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश घेतले
असतील अशा
माजी सैनिकांनी दि.15
सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, गोंदिया येथे अर्ज सादर करावेत. असे
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे. 15 सप्टेबर 2026 नंतर प्राप्त झालेले
अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment