जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Wednesday, 19 August 2026
उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
गोंदिया, दि.19 : राज्याचे उद्योग व मराठी भाषा
विभागाचे मंत्री डॉ.उदय सामंत हे शुक्रवार दि.21 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8 वाजता नागपूर येथून
मोटारीने नवेगावबांध ता.अर्जुनी मोरगाव कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता नवेगावबांध
येथे “पुस्तकांचे
गाव नवेगावबांध”
उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11 वाजता नवेगावबांध येथून मोटारीने
गोंदियाकडे प्रयाण.
दुपारी
12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गोंदिया जिल्हा उद्योग विभाग (CMEGP) व
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा. दुपारी
1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गोंदिया जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत
संवाद. दुपारी 2 वाजता पोवार बोर्डींग लक्ष्मीनगर गोंदिया येथे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत
बैठक. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मराठी भाषा विभाग आढावा बैठक
तसेच साहित्यिकांसमवेत संवाद. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात
पत्रकार परिषद. तदनंतर सायंकाळी 6 वाजता गोंदिया येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण
करतील.
0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment