जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 7 August 2026

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 10 ऑगस्ट

 


गोंदिया, दि.7 : गोंदिया जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी जिल्हयातील भात पीक अधिसुचित केलेले असुन जिल्हयातील 67,170 शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. यावर्षी खरीप भात पिकासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम रु.60/- प्रति हेक्टरी आहे. विमा संरक्षित रक्कम 60,000 रु. प्रति हेक्टरी आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.

                                                              0000000

No comments:

Post a Comment