जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 7 August 2026

वनहक्कधारक शेतकरी व 7/12 संगणीकृत न झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

 


          गोंदिया, दि.7 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2026-27 अंतर्गत जिल्हयातील वनहक्कधारक शेतकरी व 7/12 संगणीकृत न झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनधारणा दस्ताऐवजांच्या मर्यादा लक्षात घेवून, भात पिक घेणारे व योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे शेतकऱ्यांना विमा हप्ता रक्कम रु.60/- प्रति हेक्टरी व आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करून पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.

          त्यासाठी तालुकानिहाय पुढीप्रमाणे बँक व शाखाचे नाव कळविण्यात येत आहे. गोंदिया तालुक्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा-फुलचुरटोला. गोरेगाव तालुक्याकरीता महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-गोरेगाव व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-गोरेगाव. तिरोडा तालुक्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा-तिरोडा व गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल कोऑपरेटीव्ह बँक शाखा-तिरोडा. अर्जुनी मोरगाव तालुक्याकरीता बँक ऑफ इंडिया शाखा-अर्जुनी मोरगाव व बँक ऑफ बडोदा शाखा-अर्जुनी मोरगाव. देवरी तालुक्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा-देवरी व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-देवरी. आमगाव तालुक्याकरीता महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-आमगाव व बँक ऑफ इंडिया शाखा-आमगाव. सालेकसा तालुक्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-सालेकसा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-सालेकसा आणि सडक अर्जुनी तालुक्याकरीता बँक ऑफ इंडिया शाखा-सडक अर्जुनी व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-सडक अर्जुनी येथे आवश्यक कागदपत्र व विमा हप्ता जमा करुन शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत नोंदणी करावयाची आहे.

          तरी जिल्हयातील सर्व वनहक्कधारक शेतकरी व 7/12 संगणीकृत न झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या बँकेमध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.

                                                              00000000

No comments:

Post a Comment