गोंदिया जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जलसंधारणाच्या कामांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी गुणवत्तापूर्ण कामांवर भर देत निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
जिल्ह्यात मंजूर 2059 कामांपैकी 2047 कामे पूर्ण झाली असून बहुतांश कामांचे जिओ-टॅगिंगही पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 91.63 टक्के खर्च झाला असून गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 4.35 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे जलसाठा क्षमता वाढण्याबरोबरच 675 शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे.
21 ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' तर 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान 'जलसंधारण सप्ताह' साजरा करून जनजागृती करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment