गोंदिया, दि.3 :
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया व माय भारत गोंदिया यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा देशभरातील युवकांशी थेट संवाद कार्यक्रमाचे प्रक्षेपण रविवारी आयोजित
करण्यात आले.
या कार्यक्रमात धोटे
बंधू विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) अंतर्गत
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पंतप्रधानांनी आपल्या
संवादातून नशामुक्त भारताचे महत्त्व अधोरेखित करत 2047 पर्यंत विकसित भारत
घडविण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. “निरोगी व नशामुक्त युवा
हेच विकसित भारताचे भक्कम आधारस्तंभ आहेत,” असे त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे
प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले, माय भारत गोंदियाच्या पूनम दमाहे, राष्ट्रीय
सेवा योजना समन्वयक डॉ. कल्पना घोषाल, प्रा. राजकुमार पटले तसेच विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नशामुक्ती, समवयस्कांच्या दबावाला सामोरे
जाणे आणि राष्ट्रनिर्मितीत युवांची भूमिका यावर आपले विचार मांडले.
राष्ट्रीय सेवा
योजना समन्वयक डॉ. कल्पना घोषाल म्हणाल्या, “युवा ही विकसित
भारताची कणा आहेत. हा अभियान त्यांना नशेपासून दूर राहून समाजासाठी सकारात्मक
कार्य करण्याची प्रेरणा देईल.”
कार्यक्रमाचा समारोप
सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्त राहण्याची व निरोगी भारत घडविण्यात योगदान देण्याची
शपथ घेऊन करण्यात आला.
गोंदिया शिक्षण
संस्थेचे सचिव व राज्यसभा खासदार राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले व उपप्राचार्य डॉ. जी.पी.
गडेकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
0000000
No comments:
Post a Comment