गोंदिया, दि.15 :
प्रशासनाने संविधानातील मूल्ये प्रत्यक्षात उतरवावीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
मंदार पत्की यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करतेवेळी केले.
प्रारंभी वंदे मातरम् या एैतिहासिक
गाण्याने ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पोलीस बँड पथकाने
राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना
जिल्हाधिकारी श्री. पत्की म्हणाले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे गुण जशी लिहिली
गेलेली आहेत, हे गुण प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आपल्या प्रशासकीय यंत्रणेवर
आहे. प्रशासनात काम करतांना आपल्याकडून कोणत्याही कामामध्ये कोणाशी मनभेद, मतभेद
किंवा आकांक्षा ठेवून कोणाकडून काम होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त
केली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य
दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास
अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे,
सर्वश्री उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, विजय अवधाने, दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा
अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा नियोजन
अधिकारी डॉ.रुपेशकुमार राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा
खनिकर्म अधिकारी रविंद्र मारबते, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले यांच्यासह
विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते
नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त
येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वंदे मातरम् गीतानंतर पोलीस बँड पथकाने
राष्ट्रगीत आणि राज्यगीताने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी
चंद्रभान खंडाईत यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून भेटी
घेतल्या. यावेळी तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा
माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा उपनिबंधक योगेशकुमार बाकरे, जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे,
उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000
No comments:
Post a Comment