गोंदिया, दि.14 : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त
जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील उच्च
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई
फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनांसाठी सन २०२६-२७
या शैक्षणिक वर्षातील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज
भरण्याची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे.
शासनाच्या http://hmasnew.mahait.org
या ऑनलाइन पोर्टलवर १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पदवी तसेच
पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा.
ऑनलाइन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित शासकीय वसतिगृहात सादर करावीत,
असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इमाव, विमाप्र व विजाभज
मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, गोंदिया येथील गृहपाल अश्विनी दिघोरे (मो.
९७६५०८४०९०), मंगलेश गिरी (मो. ८७८८२३५७६७) तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन
कल्याण कार्यालय, गोंदिया यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालकांनी
केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment