दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक डास दिवस साजरा केला जातो. डासांमुळे पसरणाऱ्या विविध आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.
पावसाळ्यात घराभोवती, कुंड्यांमध्ये, टायरमध्ये, फुलदाणीत, फ्रीजच्या ट्रेमध्ये किंवा इतर वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आणि साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
🦟 डासांपासून होणारे प्रमुख आजार
- ॲनोफेलीस – मलेरिया
- एडिस इजिप्ती – डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका
- क्युलेक्स – हत्तीरोग व जपानी मेंदूज्वर
🛡️ डासांपासून बचावासाठी
✔️ घराभोवती पाणी साचू देऊ नका.
✔️ फ्रीजचा ट्रे, फुलदाणी व कुंड्या ३-४ दिवसांनी स्वच्छ करा.
✔️ टायर, डबे, टाक्या व कंटेनरमध्ये पाणी साचू देऊ नका.
✔️ मच्छरदाणीचा वापर करा.
✔️ पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
✔️ आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक साधनांचा वापर करा.
✔️ परिसरातील साचलेले पाणी लोकसहभागातून दूर करा.
डासांची उत्पत्ती रोखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला, आपला परिसर डासमुक्त आणि आरोग्यदायी बनवूया!
No comments:
Post a Comment