गोंदिया, दि.7 : अल्पसंख्याक
विकास विभागाच्या 19 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अल्पसंख्याक
समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक अल्पसंख्याकांच्या
समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याकांच्या कल्याणाकरीता पंतप्रधान
यांच्या नविन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती”
स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली
आहे.
त्यानुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील
अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी
यांची सदर समितीमध्ये निवड करणे प्रायोजित आहे. त्याकरीता सदर समितीमध्ये
प्रतिनिधीत्व देऊ इच्छिणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी
जिल्हाधिकारी, गोंदिया यांचे नावे दिनांक
10 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया
यांचेकडे प्रस्ताव सादर करावे. असे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक
अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment