गोंदिया, दि.31
: सन 2025-26 या
शैक्षणिक वर्षात सीईटी, जेईई, नीट यासारख्या प्रवेश पात्रता प्रक्रियेमधून व्यावसायिक
अभ्यासक्रमात आरक्षीत प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी
आपले जाती दावा पडताळणीसाठी प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया
येथे सादर केलेले आहेत परंतु अर्जदारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले
नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल आयडीवर, फोनद्वारे, पत्राद्वारे त्रुटी कळविण्यात
आलेल्या आहेत त्यांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी बुधवार दि.2 सप्टेंबर 2026 रोजी
दुपारी 12.30 वाजता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे आवश्यक मूळ
कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाती दावा पडताळणीसाठी संबंधित प्रवर्गानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 10
ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर
1961 तसेच इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 13
ऑक्टोबर 1967 च्या पूर्वीचे अथवा त्या लगतचे त्यांचे कुटुंबियांचे तसेच गोंदिया
जिल्ह्याचे सर्वसाधारण अधिवासाच्या आवश्यक त्या मुळ पुराव्यासह उपस्थित रहावे. असे
उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी कळविले
आहे.
No comments:
Post a Comment