जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 7 August 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 12,679 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम मंजूर

 


            गोंदिया, दि.7 : पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण केलेल्या 12,679 लाभार्थी शेतकऱ्यांना रुपये 75,74,73,522/- इतक्या पहिल्या हप्त्याची रक्कम शासनाकडून मंजुर करण्यात आली आहे.

           तसेच आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत ऑफलाईन तक्रारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक/ सहकारी अधिकारी श्रेणी-1 या कार्यालयात सादर करण्यात याव्यात. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था योगेशकुमार बाकरे यांनी दिली आहे.

                                                            0000000

No comments:

Post a Comment