जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 11 May 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : समस्या व तक्रारींसाठी निवडणूक निरिक्षकांशी संपर्क साधा


       भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक (Election Observers) श्री. एन.बी. उपाध्याय (N.B.Upadhyay), श्री. शफुल हक (Md. Shafful Haque) प्रभात दंडोतिया (Prabhat Dandotiya) हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. निवडणूक निरिक्षकांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह भंडारा येथे राहणार आहे. तर  श्री. तेजप्रताप सिंग फुल्का (Tejpratap Singh Phoolka) यांचा मुक्काम विश्रामगृह गोंदिया येथे राहणार आहे. नागरिकांना निवडणूक संबंधी समस्या तक्रारी असल्यास त्यांनी निवडणूक निरिक्षक यांच्याशी प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         निवडणूक निरिक्षक सकाळी 10.00 ते 11.00 पर्यंत भंडारा येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिक आपल्या तक्रारी समस्या त्यांना उपरोक्त वेळात प्रत्यक्ष भेटून सांगू शकतात. तसेच निवडणूक निरिक्षक यांचे मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. श्री. एन.बी.उपाध्याय 7620726493, श्री. शफुल हक 7020611602 श्री. तेजप्रताप सिंग फुल्का 7620622460 प्रभात दंडोतिया 7620625587  इतर वेळेत नागरिक आपल्या तक्रारी समस्या निवडणूक निरिक्षक यांच्या मोबाईलवर सुद्धा सांगू शकतात. निवडणूक निरिक्षक श्री. तेजप्रताप सिंग फुल्का हे  शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे मुक्कामी असणार आहेत. ते सकाळी 10.00 ते 11.00 पर्यंत गोंदिया येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
 ‎           निवडणूक निरिक्षक भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्हयाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदान केंद्राची पाहणी करतील. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. या दौऱ्यात सुद्धा निवडणूक निरिक्षक यांना भेटून नागरिक संवाद साधू शकतात.

No comments:

Post a Comment