जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 10 May 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक-2018 निवडणूक निरिक्षक भंडाऱ्यात दाखल


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक श्री. एन. बी. उपाध्याय, श्री. शफुल हक श्री. तेजपाल सिंग फुल्का हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. निवडणूक निरिक्षकांचा मुक्काम शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे राहणार आहे.
निवडणूक निरिक्षक सकाळी 10 ते 11 पर्यंत भंडारा येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिक आपल्या तक्रारी समस्या त्यांना उपरोक्त वेळात प्रत्यक्ष भेटून सांगू शकतात. तसेच निवडणूक निरिक्षक यांचे मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. श्री. एन. बी. उपाध्याय 09978406985, श्री. शफुल हक 09471005988 श्री. तेजपाल सिंग फुल्का 09872511105. इतर वेळेत नागरिक आपल्या तक्रारी समस्या मोबाईलवर सुद्धा सांगू शकतात. निवडणूक निरिक्षक श्री. तेजपाल सिंग फुल्का हे  शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे मुक्कामी असणार आहेत. ते  सकाळी 10 ते 11 पर्यंत गोंदिया येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
 ‎           निवडणूक निरिक्षक भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्हयाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदान केंद्राची पाहणी करतील. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. या दौऱ्यात सुद्धा निवडणूक निरिक्षक यांना भेटून नागरिक संवाद साधू शकतात.

No comments:

Post a Comment