जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 21 October 2020

कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण बघण्यासाठी सर्वेतून घेणार 2400 जणांचे रक्त नमुने

        गोंदिया दि.21(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण बघण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती  विकसित झालेली आहे किंवा नाही याबाबतचे परीक्षण करण्यासाठी जिल्ह्यात रक्त नमुने घेण्यात येणार आहे.

       कोविड -19 अर्थात कोरोनाचे रुग्ण हे लक्षणे विरहीत सुद्धा असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तीमधून कळत नकळत ज्यांना कोरोना झालेला असेल त्यांची माहिती करण्याकरिता हा सर्वे करण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील 2400 लोकांची या सर्वेमधून तपासणी करण्यात येईल. त्यापैकी 1400 रक्त नमुने हे सामान्य व्यक्तीचे, 400 नमुने हे अतिजोखमीची व्यक्तींचे आणि 600 नमुने हे कंटेटमेंट झोनमधील व्यक्तींचे घेण्यात येतील.

       सामान्य व्यक्तीमधून घेतले जाणारे 1400 व्यक्तींचे रक्त नमुने घेतले जाणार आहे.यमध्ये  300 व्यक्ती ह्या  शहरी भागापैकी असतील.200 व्यक्ती हे गोंदिया शहरातील आणि 100 व्यक्ती ह्या तिरोडा शहरातील असतील.तर उर्वरित 1100 रक्त नमुने हे ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील एका गावांमधून घेतले जाणार आहेत जिथे कोरोना विषाणूचा उद्रेक मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे.अशाप्रकारे कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण हे सर्वेतून घेतल्या जाणाऱ्या रक्त नमुन्यातून बघण्यात येईल.तरी सर्व नागरिकांनी या सर्वेमध्ये सहभाग दयावा.असे आवाहन  जिल्हा शल्यचिकित्सक,गोंदिया यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment