जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 30 June 2017

निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत - अनूप कुमार

तलाव तेथे मासोळी अभियान कार्यशाळा
• मास्टर्स ट्रेनर्सला प्रमाणपत्र वाटप
                                       • अभियानाचे सादरीकरण

          जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची 300 वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाशेजारी असलेल्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेतल्यास निलक्रांतीला दिशा मिळेल आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
       आज 30 जून रोजी जिल्हा परिषद गोंदिया, मत्स्य विभाग आणि अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने अदानी प्रकल्पातील सभागृहात आयोजित तलाव तेथे मासोळी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री.अनूप कुमार बोलत होते.
       कार्यशाळेचे उदघाटन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.साहू, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांची उपस्थिती होती.
       श्री.अनूप कुमार यावेळी म्हणाले, या अभियानामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना मिळेल. गोड्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादनासाठी होणार आहे. तलाव तेथे मासोळी या अभियानामुळे कुटूंबाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात असलेल्या तलावांच जास्तीत जास्त वापर मत्स्योत्पादनासाठी करण्यात यावा. माशांचा आहार केल्यास त्यामधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळते. प्रोटिन्समुळे मेंदूचा विकास होतो. संतुलीत आहारासाठी प्रोटीन्स आवश्यक आहे. मागास व आदिवासी भागात तलाव बोड्यामधून मासोळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेवून व आहारात त्याचा वापर करुन प्रोटीन्सची कमतरता भरुन काढता येईल. त्यामुळे कुपोषण टाळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
      आदिवासी व दुर्गम भागात पोषणाच्या दृष्टीने आहारामध्ये मासोळीच्या वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, अन्नसाखळीत प्रोटीन्सची उपयुक्तता वाढविण्यासाठी माशांचे उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादीत माशांची विक्री व्यवस्था मजबूत करणेही गरजेचे आहे. मत्स्यव्यवसायासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. शीतकरणाच्या माध्यमातून विपणन वाढविणे गरजेचे आहे. विपणन व्यवस्था सुदृढ करणे हा या अभियानाचा एक भाग आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक तलाव मत्स्य बोटूकलीसाठी आणि दहा तलाव मत्स्यसंवर्धनासाठी निवडावे. मास्टर्स ट्रेनर्सनी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करावे असेही त्यांनी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, आपला जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. मत्स्यव्यवसायाच्या स्पर्धेत जिल्हा अग्रभागी आहे. मासेमार बांधव तलाव ठेक्याने घेवून मासेमारीवर आपली उपजिविका करतात. हा व्यवसाय पुढे गेला पाहिजे, मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात करुन इतर राज्यात व देशात त्याची निर्यात झाली पाहिजे. मत्स्य सहकारी संस्थांना तलाव हे मत्स्य व्यवसायासाठी मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                                     श्री.ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात मत्स्य उत्पादन अल्प प्रमाणात होत असल्यामुळे मासेमार बांधवांचा आर्थिकस्तर उंचावण्यास अडचण येत आहे. मासेमार बांधवांना चांगल्या प्रकारचे मत्स्यजीरे व बोटूकली मिळाली पाहिजे. जिल्ह्यातील मासेमार बांधवांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मासेमार बांधवांना सक्रीय पाठबळ उत्पादन वाढीसाठी मिळत आहे. दहा महिन्यानंतर जिल्ह्यात मत्स्य क्षेत्रात वेगळे चित्र दिसेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
       विभागीय आयुक्त यांनी तलाव तेथे मासोळी अभियानाबद्दल सादरीकरण केले. सादरीकरणातून अभियानाचे उद्दिष्ट, गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, तलावांची उत्पादकता, मत्स्य आहार सकस आहार याविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
       तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत 23 ते 24 जून दरम्यान नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे श्री.नितीन गडकरी कृषि व कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी, समुदाय मत्स्य व्यवस्थापक या मास्टर्स ट्रेनर्सला मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मास्टर ट्रेनर विनोद मेश्राम, रिना रॉय व कल्पना नागपूरे यांनी मनोगत व्यक्त केले.
       कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसिलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, तालुका कृषि अधिकारी प्रदिप पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी श्रीमती सलामे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री.मुंजे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विविध मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांनी केले. संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी मानले.
ी, विविध मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज यांनी केले. संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी मानले.

सिंदीटोला येथे तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ


        जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजिविका करणाऱ्या कुटूंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ 30 जून रोजी तिरोडा तालुक्यातील सिंदीटोला येथे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्याधिकारी सी.पी.साहू, नितीन शिराळकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसिलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषि अधिकारी श्री.नायेनवाड, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, तालुका कृषि अधिकारी श्री.पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी श्रीमती सलामे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       मत्स्यपालन सहकारी संस्था सिंदीटोलाचे अध्यक्ष श्री.शेंडे, उपाध्यक्ष रविंद्र देवतळे, सचित बी.एम.तुमसरे, सदस्य सर्वश्री कुवरलाल खुळसिंगे, योगराज शेंडे, मधुकर मारबते, संजय शेंडे, ओमप्रकाश तुमसरे, अनिल देवगडे, रुखमाबाई मारबते, तसेच तलाव तेथे मासोळी विभागीय अभियानाअंतर्गत मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण घेतलेले 20 व्यक्ती यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोहू, कतला, मृगळ व सायप्रिनस जातीच्या माशाचे बोटूकली तलावात सोडण्यात आली.

Thursday 29 June 2017

दुग्धवाढीसाठी पशुपालकांना सहकार्य करणार - महादेव जानकर

देवलगाव येथे कृती शिबीर



     शेतीपुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा महत्वाचा ठरणार आहे. पशुपालकांनी दुधाळ जनावरांचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन करावे. पशुपालकांना दुग्धवाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
       29 जून रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाअंतर्गत आयोजित कृती शिबिराचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, अर्जुनी/मोरगावचे पं.स.सभापती अरविंद शिवणकर, दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.वाणी, जिल्हा उपायुक्त श्री.शहारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच कामदेव कापगते यांची उपस्थिती होती.
       श्री.जानकर यावेळी म्हणाले, 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जावून पशुपालकांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत. या योजनेमुळे निश्चितच दुग्धवाढीसाठी मदत होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे सांगून श्री.जानकर म्हणाले, चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले प्रोत्साहन राहणार आहे. पाळीव जनावरांसाठी सुध्दा ॲम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येईल. त्यामुळे आजारी दुधाळ जनावराला वेळीच उपचार करता येईल. राज्यात अशाप्रकारे 298 ॲम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसाय हा एटीएम आहे. या व्यवसायामुळे पैसा हाती खेळत असतो. जिल्ह्यात मत्स्य विकासाला सुध्दा चालना देण्यात येईल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा केवळ अनुदानासाठी लाभ न घेता त्या योजना प्रभावीपणे राबविल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ओबीसी बांधवांसाठी सुध्दा या योजनांचा लाभ देण्यात येईल असे सांगितले.
      पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा खेळता राहील. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरले जाणार आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केल्यास चांगले दिवस येण्यास मदत होईल. देवलगाव या गावाची निवड दुग्धवाढीसाठी पथदर्शी प्रकल्पात करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील दुग्धवाढीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना व दुग्ध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आनंद यांचेमार्फत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी 8 गाव असे एकूण 64 गावामध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने निवड केलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे या कार्यमोहीम शिबिराचा शुभारंभ दुग्धविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
       मान्यवरांनी दुधाळ जनावरांची पाहणी करुन पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गोंडाणे, डॉ.पटले यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच देवलगाव येथील ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे यांनी केले.

00000

निलक्रांतीचा जास्तीत जास्त निधी गोंदियासाठी देणार - महादेव जानकर

सडक अर्जुनीत भोई/ढिवर समाजाचा मेळावा
                गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावातून ढिवर व भोई बांधव मोठ्या संख्येने पारंपारिक पध्दतीने मासेमारी करुन आपली उपजिविका करतात. जिल्ह्यातील मासेमारी बांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासोबतच मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेण्यासाठी निलक्रांती योजनेचा जास्तीत जास्त निधी गोंदिया जिल्ह्यासाठी देणार. असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
       सडक/अर्जुनी येथील तेजस्वीनी लॉन येथे 29 जून रोजी आयोजित गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भोई/ढिवर समाजाच्या विविध मागण्या संदर्भात आयोजित मेळाव्याचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनीच्या पं.स.सभापती कविता रंगारी, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जि.प.माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, संजय केवट, गोंदिया जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष तिमाजी चाचेरे, उपाध्यक्ष अजय हलमारे, भंडारा जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, संघर्ष वाहिनी नागपूरचे संयोजक दिनानाथ वाघमारे, प्रा.अजय मोहनकर, सडक/अर्जुनी मच्छीमार संघाचे अध्यक्ष वासूदेव खेडकर यांची उपस्थिती होती.
      गोंदिया जिल्हा हा भविष्यात मासेमारीचा हब होईल असा विश्वास व्यक्त करुन श्री.जानकर म्हणाले, प्रशासनाने यासाठी जागा उपलब्ध करुन दयावी. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. राज्याच्या मासेमारीचे धोरण उद्या म्हणजेच 30 जूनला जाहीर करण्यात येईल. गोड्या पाण्याला पुढे ठेवून हे धोरण जाहीर करण्यात येईल. 41 हजार कोटीचे कर्ज सागरी मासेमारी करणाऱ्यांना देण्यात आले आहे. त्या तुलनेत गोड्या पाण्यातील मासेमार उपेक्षीत राहिले. आता त्यांचे उपेक्षितपण संपणार आहे. नाबार्डकडून मत्स्य सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येईल असे ते म्हणाले.
       जिल्ह्यात मासेमारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जावे लागत होते असे सांगून श्री.जानकर पुढे म्हणाले, येत्या चार दिवसात या संस्थांच्या निबंधकाचे नोंदणी कार्यालय गोंदिया येथे सुरु करण्यात येईल. मागेल त्याला मत्स्यबीज व मत्सखाद्य देण्यात येईल. त्यामुळे आता मत्स्यशेती करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन करुन ते पुढे म्हणाले, ढिवर बांधवांना मासेमारीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येईल यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सीड, फीड, मार्केटींग आणि स्कीलचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. पालकमंत्री बडोले यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. मासेमारीचा ग्रामपंचायत मार्फत ठेका देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
      ढिवर व भोई बांधवांनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे सांगून श्री.जानकर म्हणाले, निलक्रांती योजनेच्या माध्यमातून या समाजातील मुले एमपीएससी, युपीएससीची परीक्षा देवून प्रशासकीय अधिकारी कसे घडतील यासाठी मदत करण्यात येईल. जिल्ह्यातील मत्स्य, दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. गोंदिया येथे जागा उपलब्ध झाल्यास मासेमारी संस्थांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल. मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा देण्यात आल्यामुळे निश्चितच या क्षेत्रात क्रांती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, निसर्गाने या जिल्ह्याला भरभरुन दिलेले आहे. इथले अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जातीतील लोक मोठ्या प्रमाणात भूमीहिन आहेत, त्यामुळे या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. 67 टक्के भूभागातील जलावर मासेमारी होत असतांना सागरी क्षेत्र केवळ 35 टक्के आहे. मात्र सागरी मासेमारी करणाऱ्या मासेमाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. ही तफावत आता दूर करुन गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांना सुध्दा मदत करण्यासाठी शासन वचनबध्द आहे. जिल्ह्यातील ढिवर/भोई समाज दारिद्रय रेषेखालील आहे. त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यासाठी विविध योजना मत्स्य विभाग राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                               
       गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा 64 टक्के असतांना त्यांच्यासाठी जास्तीत जास्त योजनांचा लाभ दिला पाहिजे असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, मासे शीतगृहात ठेवण्यासाठी शीतगृहाच्या बांधकामासाठी अनुदान मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक तलावात मासेमारी झाली पाहिजे असे शासनाने धोरण आहे. पंजीबध्द असलेल्या मासेमारी संस्थांना मासेमारीसाठी तलावा मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील मासेमारी बांधवांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करुन श्री.बडोले म्हणाले, मत्स्य, दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांची नोंदणी गोंदिया जिल्ह्यात व्हावी यासाठी जिल्हा उपनिबंधकाचे कार्यालय गोंदिया येथे झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       जिल्हाधिकारी श्री.काळे म्हणाले, गोड्या पाण्यातून मासेमारी करणाऱ्या मासेमारी बांधवांच्या अनेक अडचणी आहेत. दिवसेंदिवस तलावात येणारे शेतातील पाणी हे रसायनयुक्त असते. त्यामुळे या पाण्याचा तलावातील मासेमारीवर सुध्दा परिणाम झाला आहे. तलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून यासाठी राज्यात केवळ गोंदिया जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन दिला आहे. सेंद्रीय शेतीचे अतिरिक्त 31 गटसुध्दा जिल्ह्यात तयार केले आहे. सेंद्रीय शेतीकडे मत्स्य विभागाने लक्ष दयावे असे सांगून ते म्हणाले, सेंद्रीय शेतीमुळे शेजारच्या तलावातून चांगली मासेमारी करता येईल.
     श्री.ठाकरे म्हणाले, तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया ओळखला जातो. मासेमारी ही इथल्या ढिवर बांधवांच्या उपजिविकेचे साधन आहे. प्रति माणसी उत्पन्नात आपण मागे आहोत. तलाव तेथे मासोळी हे अभियान विभागीय आयुक्तांचा उपक्रम आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा ढिवर बांधवांना होणार असल्यामुळे त्यांच्या उपजिविकेच्या साधनात निश्चितच वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या बऱ्याच वर्षानंतरही भोई/ढिवर बांधवांच्या समस्या सुटलेल्या नाही. या बांधवांना शासन योग्यप्रकारे मदत करणार असून त्यांचे जीवनमान निश्चितच उंचावेल. तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त ढिवर बांधवांच्या वस्तीला मिळाल्यास त्यांच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      श्री.अग्रवाल म्हणाले, जिल्ह्यातील ढिवर/भोई बांधव पारंपारिक पध्दतीने मत्स्यव्यवसाय करतात. व्यवसाय करतांना त्यांना अनेक अडचणी येतात. या पारंपारीक व्यवसायाचे बळकटीकरण आवश्यक आहे. कृषि क्षेत्राप्रमाणे मत्स्यशेती करणाऱ्यांना सुध्दा अनुदान तसेच इतर प्रकारे मदत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.वलथरे व श्री.वाघमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. मेळाव्याला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भोई/ढिवर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय मोहनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री.कुऱ्हाडे यांनी मानले.

Tuesday 27 June 2017

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’: ‘शेतकरी कर्जमाफी’ वर 2 जुलैपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मी मुख्यमंत्री बोलतोयहा कार्यक्रम यावेळी शेतकरी कर्जमाफीया विषयावर होणार असून, या कार्यक्रमासाठी शनिवार 2 जुलै 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून, हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.comया ई-मेल वर तसेच ८२९१५२८९५२ या क्रमांकावर व्हॅाटसॲपद्वारे रेकार्डिंग करून किंवा संदेश स्वरुपात पाठविता येतील, सोबत आपले छायाचित्रही पाठविता येऊ शकेल.
शेतकरी कर्जमाफी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाया विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात कर्जमाफी योजनेचे निकष, योजनेची अंमलबजावणी, नियमित कर्जफेडीसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शेती क्षेत्रातील गुंतवणूक आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात कृषी, पशूसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास, सहकार व पणन तसेच शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सारख्या उपक्रमांचाही समावेश असेल.
०००० ��करण, शेती क्षेत्रातील गुंतवणूक आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.

या कार्यक्रमात कृषी, पशूसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास, सहकार व पणन तसेच शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सारख्या उपक्रमांचाही समावेश असेल.
००००

पुणतांब्यासह 40 गावातील शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार कर्जमाफी नंतर आता शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय राज्य शासनाने घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील 40 गावातील शेतकरी बांधव मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी येथे आले होते. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, मंत्री  श्री. पाटील व श्री. निलंगेकर यांचा सत्कार पुणतांबा येथील शेतकरी बांधवांनी केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक अशी राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. राज्याने गेली दोन ते तीन वर्ष सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. आभाळच फाटलंय त्यातून खचून न जाता ते शिवण्याचे काम राज्य शासनाने सुरू केलं आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य शासन तयार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला आहे. शेतकरी कर्जमुक्त झाल्यावर मी खऱ्या अर्थाने समाधानी होईल. राज्य शासनामार्फत शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कृषि पंपांना सौरऊर्जा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. दोन दुष्काळांचा सामना करू शकेल एवढे पाणी या माध्यमातून मिळाले आहे.
शेतीला शाश्वत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून राज्य शासन सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चेद्वारे तोडगा काढत आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो. शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होणे हे अंतिम ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज वर्षा निवासस्थानी पुणतांबा येथील शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीच्या निर्णयाबाबत त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कारही केला. यावेळी धनंजय जाधव, संदीप गिड्डे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन


                           *      निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
                           *       पंचवीस, वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके
                           *      तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

:महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये, 20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र माझाया संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.comया ईमेल वर दि.15जुलै 2017 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30इंच एचडी (हाय रिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.

राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक सहायक संचालक(माहिती) सागरकुमार कांबळे (9175544155) यांच्याशी संपर्क साधावा.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांचे महत्वपूर्ण योगदान - राजकुमार बडोले

सामाजिक न्याय दिन साजरा
         
    देशाच्या व्यवस्थेला बदलविण्याच्या कामात त्याकाळी महाराष्ट्र अग्रेसर होता. फुले-शाहू-आंबेडकरांनी त्यावेळीच सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात त्यांच्या करवीर संस्थानातून केली. मागास व वंचित घटकातील लोक शिकून पुढे गेले पाहिजे ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्याकाळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यात शाहू मजाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिले. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
    26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण विभाग कार्यालय गोंदियाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, जि.प.पशू व कृषि समिती सभापती छाया दसरे, जि.प.माजी सभापती सविता पुराम यांची उपस्थिती होती.
         पालकमंत्री बडोले म्हणाले, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम शाहू महाराजांनी त्याकाळी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विशिष्ट जातीच्या विकासासाठी काम केले नसून त्यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी काम केले आहे. सामाजिक उत्थानाची प्रक्रिया त्या काळातच सुरु झाली. या कार्यात समाजसुधारक व संतांचे योगदान महत्वाचे होते. प्रस्थापितांना विरोध करुन समाजसुधारक व संतांनी त्या काळीच सुधारणांची सुरुवात केली. त्यांनी मानव मुक्तीच्या दृष्टीने काम केले असे त्यांनी सांगितले.
        जातीपाती विरहीत समाज सुधारणांचे काम झाले पाहिजे या ध्यासाने समाज सुधारणांसाठी या समाज सुधारकांनी पुढाकार घेतल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्यांचा समतेचा संदेश सर्वसामान्यपर्यंत गेला पाहिजे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती बंद झाल्या पाहिजे. सामाजिक न्याय विभाग समाजातील विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. ज्या मुलांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांना निवासाच्या दृष्टीने वसतीगृहाची व्यवस्था यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे श्री.बडोले यांनी सांगितले.
         उपेक्षित घटकाचा विकास करण्याचा संकल्प असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, 2019 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे काम करण्यात येईल. मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका तयार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न, जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रश्न सोडविण्यात येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्योजकता विकास योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकातील युवकांना उद्योजक बनविण्यात येईल. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यावर्षी 14 विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. पुढच्या वर्षी 25 विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जातील असा विश्वास श्री.बडोले यांनी यावेळी व्यक्त केला.
       आमदार पुराम म्हणाले, शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे अत्यंत मौल्यवान दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केल्यामुळे वंचित घटकातील व्यक्तींना चांगल्या पदावर जाता आले. आरक्षणामुळे सामाजिक प्रगती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
       श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाज कल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्षारोपण करतांना भारतीय वृक्षांची लागवड करावी. ज्यामुळे वन्यप्राणी पक्षांचे रक्षण करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाज कल्याण समिती सभापती श्री.वडगाये यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
       प्रारंभी सामाजिक न्याय भवन परिसरात पालकमंत्री यांचे आगमन होताच त्यांनी एक वर्ष पूर्ण केलेल्या 700 झाडांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. सामाजिक न्याय दिनानिमित्त नागपूर विभागातील आश्रम शाळेतील व वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा, जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन सन 2017 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र, दिव्यांग विवाहीत जोडप्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
      कार्यक्रमाला नागपूर विभागातील समाज कल्याण विभागाअंतर्गत येत असलेले विविध आश्रमशाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त श्री.वानखेडे यांनी केले. संचालन प्रा.रजनी गायधने यांनी केले, उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी संभाजी पोवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याण निरीक्षक अंकुश केदार यांच्यासह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील व जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000


Friday 16 June 2017

बँकांनी मुद्रा योजना प्रभावीपणे राबवावी - आ.गोपालदास अग्रवाल

गोंदियात मुद्रा योजना मेळावा व उत्कर्षची सभा
     बेरोजगार युवक-युवती आणि गरजू व्यक्तींना उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबी बनविण्यासाठी त्वरित कर्ज देण्याची सुविधा प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना रोजगार उभारुन स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी मुद्रा बँक योजना प्रभावीपणे राबवावी. असे प्रतिपादन राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
       आज 16 जून रोजी गोंदिया येथील जैन कुशल सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा व उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटक म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अर्जुनी/मोरगावच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, लेखा अधिकारी श्री.बावीसकर, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष दिपाली वैद्य, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, सहायक रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक श्री.राठोड, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या आर्थिक साक्षरता कक्षाचे व्यवस्थापक श्री.पहिरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
       आ.अग्रवाल म्हणाले, सावित्रीबाई फुलेमुळे महिलांच्या सशक्तीकरणाला गती मिळाली. अलिकडच्या 10 ते 15 वर्षात बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात बचतगटाचे चांगले काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गोंदिया तालुक्यात माविमकडे कमी गावे असल्यामुळे बचतगटांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात माविमचे काम चांगल्याप्रकारे सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बचतगटांचे काम माविमकडे असले पाहिजे. माविमच्या माध्यमातून नियोजनपूर्ण कामे करण्यात येत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. बचतगटाची चळवळ जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करायची असेल तर माविमचा व्याप वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
      मागील दोन वर्षात मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 123 कोटी रुपये कर्ज रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगून श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, यापूर्वी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांनी रोजगार निर्मितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन दिलेले नाही. गोंदियात बचतगटांच्या उत्पादित वस्तूंची विक्री करण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या जागेवर मॉल उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ही वन विभागाची जागा माविमला मिळाली पाहिजे यासाठी आपला आग्रह राहणार आहे. या जागेवर हॉल, शॉपींग, कॉम्पलेक्स व माविमचे कार्यालय अशी एक चांगली वास्तू बनविण्यासाठी निश्चितच पुढाकार घेण्यात येईल. बचतगटाच्या महिलांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम माविम करीत असल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
       श्रीमती मेंढे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविण्यात येतात. त्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. बचतगटातील महिलांना वैयक्तीकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 10 लक्ष रुपयापर्यंतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या कर्ज सुविधेचा लाभ बचतगटातील महिलांना मिळाला पाहिजे. बचतगटामुळे महिला आता सक्षम झाल्या आहेत.
       शासनाच्या विविध कार्यालयाच्या इमारतील बचतगटाच्या उत्पादित वस्तूंना विक्री केंद्र उपलब्ध झाले पाहिजे असे सांगून श्रीमती मेंढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांनी दुग्ध व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात सुरु करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कुटूंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. बचतगटाने उत्पादित केलेली वस्तू ही चांगल्या दर्जाची कशी असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. बचतगटातील महिलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असून माविमच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या प्रगतीला दिशा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.महिरे म्हणाले, बचतगटामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना वैयक्तीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बचतगटातील महिलांना शासकीय इमारतीत खाणावळ तसेच कॅन्टीन सुरु करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील आहोत. बचतगटातील महिला ज्या वस्तू व साहित्याची निर्मिती करतात त्याची गुणवत्ता ही उत्तमच असते. त्यामुळे त्यांना चांगला पैसा मिळण्यास मदत होते. माविमने बचतगटातील महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने आणखी जोमाने काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.
       मार्गदर्शक म्हणून बोलतांना श्री.श्रीवास्तव म्हणाले, मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून तीन गटात कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. जी गरजू व्यक्ती आहे, ज्याला उद्योग व्यवसाय सुरु करण्याची आवड आहे त्याने या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. बँकांकडून मुद्रा योजनेसाठी कर्ज मागण्यास येणाऱ्या व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन व कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. कोणतीही बँक मुद्दामहून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असेल तर त्यावर निश्चित कार्यवाही करण्यात येईल. आवश्यक ती कागदपत्रे बँकांकडे कर्ज मागणाऱ्या व्यक्तींनी सादर करावी. काही तक्रारी व अडचणी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे ते यावेळी म्हणाले.
       श्री.गणराज यांनी कौशल्य विकासासोबतच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानाबाबत उपस्थित महिलांना माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरिक्षक श्री.राठोड यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासह उद्योग केंद्राच्या विविध योजनांविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच स्टार स्वरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या आर्थिक साक्षरता कक्षाचे व्यवस्थापक श्री.पहिरे यांनी सुध्दा विस्तृत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी उपस्थित महिलांचे व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लेक वाचवा, हुंडाबंदी या विषयावर सविस्तर प्रबोधन केले.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून झाशीची राणी ग्रामसंस्था पिंडकेपार, सर्वात जास्त 10 लक्ष 50 हजार कर्ज घेणाऱ्या बाघोली येथील महेश्वरी महिला बचतगट, 8 लक्ष रुपये कर्ज घेणारा अंभोरा येथील सावित्री महिला बचतगट, उत्तम पशुसखी म्हणून डव्वा येथील सुनिता ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी म्हणून सुनिता कटरे, कुंजलता भुरकुडे, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून गिता भोयर, उत्कृष्ट उद्योजक म्हणून एकोडी येथील गुल महिला बचतगट, उत्कृष्ट महिला उद्योजक म्हणून राणु वर्मा यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
       प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील शिशु गटातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने चिचगाव येथील सरिता रहांगडाले यांना शिवणकामासाठी 45 हजार रुपये कर्जाचे मंजूरीपत्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने गोंदिया येथील हितेंद्र राहूलकर यांना किशोर गटातून 1 लक्ष रुपये कर्जाचे मंजूरीपत्र, गोरेगाव येथील दिगंबर बंसोड याला किशोर गटातून 1 लक्ष 20 हजार रुपये दुग्ध व्यवसायासाठी कर्जाचे मंजूरीपत्र, कामठा येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने 3 लाभार्थ्यांना शिशु गटातून कर्जाचे मंजूरीपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
        यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या करुणा आगडे, बँक ऑफ बडोदाचे नितीन मौदेकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे तरुण चॅटर्जी, बँक ऑफ इंडियाचे एस.पी.त्रिवेदी, कॅनरा बँकेचे श्री.रमणकुमार यांचीही मंचावर उपस्थिती होती. यावेळी अलका रंगारी, रामू वर्मा, अनिता बडगे, निशा ठवकर या बचतगटातील महिलांनी आपण करीत असलेल्या उद्योगाबाबतची माहिती दिली.
        उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राची सर्वसाधारण सभा यावेळी संपन्न झाली. व्यवस्थापक मोनिता चौधरी यांनी अहवालाचे वाचन केले. अध्यक्ष दिपाली वैद्य, सचिव तुलसी चौधरी यांच्यासह केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या वेध उत्कर्षाचा सन 2016-17 च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बचतगटातील उत्पादित मालाच्या विक्रीचे तसेच जिल्हा उद्योग केंद्र, बँक ऑफ इंडिया, जिल्हा कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या विविध योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, प्रियंका मुंजे, नामदेव बांगरे, सुशील पंचभाई, प्रफुल्ल अवघड, एकांत वरधने, केंद्राचे व्यवस्थापक मोनिता चौधरी, लेखापाल आशिष बारापात्रे, उपजिविका समन्वयक कुंदा डोंगरे, क्षमता बांधणी समन्वयक चित्ररेखा जतपेले, सहयोगीनी सुनिता कटरे, हेमलता पडोळे, कुंजलता भुरकुडे, तेजश्वरी येरकुडे, पुनम साखरे, सुर्यकांता मेश्राम, रोहिणी साखरे, शालु मेश्राम, दुर्गा रंगारी, गीता भोयर, जिल्हा माहिती कार्यालयाचे पंढरी लुटे व ज्ञानेश्वर वावडेकर यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याला गोंदिया तालुक्यातील माविम अंतर्गत कार्यरत असलेल्या बचतगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.सोसे यांनी केले. संचालन योगिता राऊत यांनी केले, उपस्थितांचे आभार मोनिता चौधरी यांनी मानले.

Thursday 15 June 2017

विकासामध्ये महिलांची महत्वाची भूमिका - सौ. उषाताई मेंढे, अध्यक्ष जि.प.

              केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये महिलांचे मोठे योगदान असून देशाच्या सकारात्मक विकासामध्ये महिलांची महत्वाची भूमिका असल्याचे मत गोंदिया जिल्हा परिषदेच्या सौ. उषाताई मेंढे यांनी कुडवा येथे  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित विशेष प्रचार अभियानात बोलतांना व्यक्त केले.
            गोंदियापासून जवळच असलेल्या कुडवा येथे क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने सरकारच्या विविध योजनांच्या प्रचारार्थ विशेष प्रचार अभियानाचे आयोजन विशाल लॉन येथे आज दिनांक 15 जून 2017 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. गोंदिया पंचायत समितीच्या सभापती सौ. माधूरी हरीणखेडे, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख , गट विकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, कुडवाचे सरपंच शैलेंद्र वासनिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या खुशबू टेंभरे, पंचायत समिती सदस्या किर्ती पटले, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार , विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक राणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होते. 
             यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे म्हणाल्या की, महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. आज महिला ही सबला नसून देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या आणि स्वत:चा विकास साध्य करण्यासाठी महिलांनी विकासाच्या या  विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
            यावेळी आपले विचार व्यक्त करतांना बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनी जनधन तसेच, विमा योजनाबद्दल माहिती देतांना सांगितले की, आज बँकेमार्फत एकूण 53 योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या बँक खात्यासोबत आधार नंबर लिंक करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
            बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत बोलतांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी सांगितले की, सन 1951 मध्ये पहिल्या जनगणनेने दर एक हजारी पुरुषामागे 956 महिला असे प्रमाण होते. हे आज 918 असे आहे ही तफावत दुर करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबविण्यात येत असून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यावर त्यांनी भर दिला. 
         स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलतांना उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश देशमुख यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत सर्वांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
                या विशेष प्रचार अभियानाची सुरुवात योग प्रात्यक्षिकेने करण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हींगचे राष्ट्रीय योग प्रशिक्षक समीर उपाध्याय यांनी योगाबाबत माहिती देवून योगाबाबतचे प्रात्यक्षिके करुन दाखविले. यात उपस्थिंतांनी सहभाग घेतला.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनवने यांनी केले. विशेष प्रचार अभियानाच्या निमित्ताने कुडवा येथे सकाळी जनजागृती रॅली सुध्दा काढण्यात आली. या रॅलीत कुडव्याचे संरपंच शैलेद्र वासनिक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले. या रॅलीत महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
       विशेष प्रचार अभियानाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. विभागाच्या वतीने प्रदर्शनी लावण्यात आली होती. यामध्ये बँक ऑफ इंडिया, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, स्वच्छ भारत मिशन आदिनी आपल्या योजनांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Tuesday 13 June 2017

कर्जाची परतफेड करण्यात महिलांचीच प्रामाणिकता - उषा मेंढे

आमगाव येथे वार्षिक सभा व प्रधानमंत्री मुद्रा बँक मेळावा

        केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला हया आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. असे प्रतिपादन जि.प.अअध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
        महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व तहसिल कार्यालय आमगाव यांच्या संयुक्त वतीने 13 जून रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज येथे आयोजित स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जि.प.सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य छबू उके, सिंधू भूते, गटविकास अधिकारी श्री.पांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, कनिष्ठ कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक श्री.राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
        श्रीमती मेंढे म्हणाल्या, घरच्या कर्त्या पुरुषाला आर्थिक सहकार्य करण्याचे कामही बचतगटातील महिला करतात. संकट काळात महिलेने जमा केलेला पैसा उपयोगी पडतो. एक-एक रुपयाची बचत करुन ती पैसा जमा करते. नोटबंदीच्या काळात महिलांनी खऱ्या अर्थाने बचत केलेला पैसा उपयोगी पडला. माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांच्या बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. गोंदिया जिल्हा निसर्ग संपन्न असल्यामुळे बचतगटातील महिलांनी वनावर आधारित विविध व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. महिला आता अबला राहिल्या नसून त्या सबला झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या.  
        केशवराव मानकर म्हणाले, ज्या व्यक्तींना स्वत:चा रोजगार उभा करुन स्वावलंबी व्हायचे आहे त्यांचेसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत उपयुक्त आहे. बेरोजगार तरुण-तरुणी व गरजू व्यक्तींना स्वबळावर उभे करण्यासाठी मुद्रा योजना आशेचा किरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे. कौशल्य विकसीत करुन स्वावलंबी करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. फार कमी महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले असून मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले पाहिजे असे ते म्हणाले.
       काळा पैसा बाहेर यावा यासाठी नोटबंदी केल्याचे सांगून श्री.मानकर पुढे म्हणाले, जास्तीत जास्त व्यक्तींनी कॅशलेस व्यवहार करावा. कॅशलेस व्यवहारामुळे प्रगतीला वाव आहे. भिम ॲप आधार कार्डला लिंक केले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी काम करावे असे ते म्हणाले.
       आ.पुराम म्हणाले, पुर्वी चुल आणि मुल या क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढे येत आहे. आज त्या व्यवहारासाठी बँकेत सुध्दा येत आहे. बँकांच्या मदतीमुळे महिला पुढे येवू लागल्या आहे. बेरोजगार, गरजू व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ बँकांनी जास्तीत जास्त व्यक्तींना दयावा. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना सक्षम व योग्य मार्गदर्शन करीत आहे. महिला एकत्र येवून काम करीत आहे. बचतगटातील महिलांच्या मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
       चांगल्या कामगिरी करणाऱ्या महिलांना आज सन्मानीत करण्यात येत असल्याचे सांगून श्री.पुराम म्हणाले, माविमचे काम उर्जा देणारे आहे. आमगाव येथील स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राला सभागृहाची, संगणकाची आवश्यकता आहे, हे माहित असल्याचे सांगून श्री.पुराम पुढे म्हणाले, आमदार निधीतून यासाठी पैसा देता येत नसल्यामुळे खासदार निधीतून स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्रासाठी 1 लक्ष रुपये मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
        डॉ.भूजबळ म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. जिल्ह्यात काही मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना मोठ्या व्याजदराचे कर्ज देवून वसुलीसाठी त्रास देत आहे. सुसुत्रतेने प्रधानमंत्री योजनेतून महिलांना कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. दारुबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या बचतगटातील महिलांना पोलीस विभाग सहकार्य करेल. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे.                                                                    दारुबंदीसाठी महिलांनी जिल्ह्यात चांगली भूमिका बजावली असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, महिला केवळ घरच्या अर्थमंत्रीच नव्हे तर त्या चांगल्या कायदामंत्री देखील आहे. घरी महिला जे सांगतील जे ठरवतील तोच निर्णय होत असतो. अर्थकारण, समाजकारण व राजकारणात देखील महिला महत्वाची भूमिका बजावत आहे. माविमच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यात येत आहे. पोलिसांची भूमिका केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्ह्यांचा तपास करणे एवढीच नाही तर चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी श्रीवास्तव म्हणाले, मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना दिलेल्या कर्जाचा उपयोग त्या चांगल्याप्रकारे करीत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच केली पाहिजे. जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारावर भर दिला पाहिजे. येणाऱ्या काळात मोबाईल हेच बँक म्हणून उपयोगात येणार आहे. छोटे-छोटे व्यवहार देखील कॅशलेस पध्दतीने केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी सविता पुराम यांनी विविध योजनेविषयी, तहसिलदार साहेबराव राठोड यांनी महसूल विभागाच्या योजना, श्री.गणराज व श्री.राठोड यांनी रोजगार व कौशल्य विकासाच्या विविध योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
       प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कॅनरा बँक, बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आदींनी बचतगटांच्या महिलांना शिशु गटातून कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्र तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वीनी जनईकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
        मान्यवरांच्या हस्ते स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव सन 2016-17 वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी गाव हागणदारीमुक्त करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून महिला आघाडी ग्रामसंस्था बोरकन्हार, चैतन्य ग्रामसंस्था ठाणा, सर्वात जास्त कर्ज घेणार बचतगट म्हणून इंदिरा गांधी महिला बचतगट बिरसी, संगीनी महिला बचतगट आमगाव, उत्कृष्ट पशूसखी छाया ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी शोभा तावाडे व संध्या पटले, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून तृप्ती बहेकार व दुर्गा बोपचे यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
        स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील यावेळी संपन्न झाली. या सभेत सन 2016-17 चा प्रगती अहवाल मांडण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापूरे होत्या. यावेळी कार्यकारीणीतील पदाधिकारी  छाया ठाकरेाा
, शोभा पटले, तृप्ती बहेकार, अरुणा बहेकार, वनिता मेहर, पुष्पा कुंभारे, उर्मिला शरणागत, चंदा बिसेन, शालू उके, नंदा तुरकर, खुरवंता चौधरी यांची उपस्थिती होती. साधन केंद्राच्या व्यवस्थापक आशा दखने यांनी अहवाल वाचन केले.
       आमगाव तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉल तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता.

       कार्यक्रमाला आमगाव तालुक्यातील 300 बचतगटातील 1500 महिलांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, नामदेव बांगरे, श्री.पंचभाई, पुस्तकला खैरे, शोभा तावाडे, संगीता बोरकर, संख्या पटले, दिपा साखरे, दुर्गा बोपचे, रामेश्वर सोनवाने, प्रफुल अवघड, एकांत वरधने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आशा दखने यांनी मानले.

कर्जाची परतफेड करण्यात महिलांचीच प्रामाणिकता - उषा मेंढे

             आमगाव येथे वार्षिक सभा व प्रधानमंत्री मुद्रा बँक मेळावा






        केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला हया आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. असे प्रतिपादन जि.प.अअध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
        महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व तहसिल कार्यालय आमगाव यांच्या संयुक्त वतीने 13 जून रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज येथे आयोजित स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जि.प.सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य छबू उके, सिंधू भूते, गटविकास अधिकारी श्री.पांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, कनिष्ठ कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक श्री.राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
        श्रीमती मेंढे म्हणाल्या, घरच्या कर्त्या पुरुषाला आर्थिक सहकार्य करण्याचे कामही बचतगटातील महिला करतात. संकट काळात महिलेने जमा केलेला पैसा उपयोगी पडतो. एक-एक रुपयाची बचत करुन ती पैसा जमा करते. नोटबंदीच्या काळात महिलांनी खऱ्या अर्थाने बचत केलेला पैसा उपयोगी पडला. माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांच्या बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. गोंदिया जिल्हा निसर्ग संपन्न असल्यामुळे बचतगटातील महिलांनी वनावर आधारित विविध व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. महिला आता अबला राहिल्या नसून त्या सबला झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या.  
        केशवराव मानकर म्हणाले, ज्या व्यक्तींना स्वत:चा रोजगार उभा करुन स्वावलंबी व्हायचे आहे त्यांचेसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत उपयुक्त आहे. बेरोजगार तरुण-तरुणी व गरजू व्यक्तींना स्वबळावर उभे करण्यासाठी मुद्रा योजना आशेचा किरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे. कौशल्य विकसीत करुन स्वावलंबी करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. फार कमी महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले असून मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले पाहिजे असे ते म्हणाले.
       काळा पैसा बाहेर यावा यासाठी नोटबंदी केल्याचे सांगून श्री.मानकर पुढे म्हणाले, जास्तीत जास्त व्यक्तींनी कॅशलेस व्यवहार करावा. कॅशलेस व्यवहारामुळे प्रगतीला वाव आहे. भिम ॲप आधार कार्डला लिंक केले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी काम करावे असे ते म्हणाले.
       आ.पुराम म्हणाले, पुर्वी चुल आणि मुल या क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढे येत आहे. आज त्या व्यवहारासाठी बँकेत सुध्दा येत आहे. बँकांच्या मदतीमुळे महिला पुढे येवू लागल्या आहे. बेरोजगार, गरजू व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ बँकांनी जास्तीत जास्त व्यक्तींना दयावा. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना सक्षम व योग्य मार्गदर्शन करीत आहे. महिला एकत्र येवून काम करीत आहे. बचतगटातील महिलांच्या मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
       चांगल्या कामगिरी करणाऱ्या महिलांना आज सन्मानीत करण्यात येत असल्याचे सांगून श्री.पुराम म्हणाले, माविमचे काम उर्जा देणारे आहे. आमगाव येथील स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राला सभागृहाची, संगणकाची आवश्यकता आहे, हे माहित असल्याचे सांगून श्री.पुराम पुढे म्हणाले, आमदार निधीतून यासाठी पैसा देता येत नसल्यामुळे खासदार निधीतून स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्रासाठी 1 लक्ष रुपये मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
        डॉ.भूजबळ म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. जिल्ह्यात काही मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना मोठ्या व्याजदराचे कर्ज देवून वसुलीसाठी त्रास देत आहे. सुसुत्रतेने प्रधानमंत्री योजनेतून महिलांना कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. दारुबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या बचतगटातील महिलांना पोलीस विभाग सहकार्य करेल. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे.                                                                                           
        दारुबंदीसाठी महिलांनी जिल्ह्यात चांगली भूमिका बजावली असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, महिला केवळ घरच्या अर्थमंत्रीच नव्हे तर त्या चांगल्या कायदामंत्री देखील आहे. घरी महिला जे सांगतील जे ठरवतील तोच निर्णय होत असतो. अर्थकारण, समाजकारण व राजकारणात देखील महिला महत्वाची भूमिका बजावत आहे. माविमच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यात येत आहे. पोलिसांची भूमिका केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्ह्यांचा तपास करणे एवढीच नाही तर चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी श्रीवास्तव म्हणाले, मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना दिलेल्या कर्जाचा उपयोग त्या चांगल्याप्रकारे करीत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच केली पाहिजे. जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारावर भर दिला पाहिजे. येणाऱ्या काळात मोबाईल हेच बँक म्हणून उपयोगात येणार आहे. छोटे-छोटे व्यवहार देखील कॅशलेस पध्दतीने केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी सविता पुराम यांनी विविध योजनेविषयी, तहसिलदार साहेबराव राठोड यांनी महसूल विभागाच्या योजना, श्री.गणराज व श्री.राठोड यांनी रोजगार व कौशल्य विकासाच्या विविध योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
       प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कॅनरा बँक, बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आदींनी बचतगटांच्या महिलांना शिशु गटातून कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्र तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वीनी जनईकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
        मान्यवरांच्या हस्ते स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव सन 2016-17 वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी गाव हागणदारीमुक्त करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून महिला आघाडी ग्रामसंस्था बोरकन्हार, चैतन्य ग्रामसंस्था ठाणा, सर्वात जास्त कर्ज घेणार बचतगट म्हणून इंदिरा गांधी महिला बचतगट बिरसी, संगीनी महिला बचतगट आमगाव, उत्कृष्ट पशूसखी छाया ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी शोभा तावाडे व संध्या पटले, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून तृप्ती बहेकार व दुर्गा बोपचे यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
        स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील यावेळी संपन्न झाली. या सभेत सन 2016-17 चा प्रगती अहवाल मांडण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापूरे होत्या. यावेळी कार्यकारीणीतील पदाधिकारी  छाया ठाकरेाा
, शोभा पटले, तृप्ती बहेकार, अरुणा बहेकार, वनिता मेहर, पुष्पा कुंभारे, उर्मिला शरणागत, चंदा बिसेन, शालू उके, नंदा तुरकर, खुरवंता चौधरी यांची उपस्थिती होती. साधन केंद्राच्या व्यवस्थापक आशा दखने यांनी अहवाल वाचन केले.
       आमगाव तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉल तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता.

       कार्यक्रमाला आमगाव तालुक्यातील 300 बचतगटातील 1500 महिलांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, नामदेव बांगरे, श्री.पंचभाई, पुस्तकला खैरे, शोभा तावाडे, संगीता बोरकर, संख्या पटले, दिपा साखरे, दुर्गा बोपचे, रामेश्वर सोनवाने, प्रफुल अवघड, एकांत वरधने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आशा दखने यांनी मानले.