जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 10 May 2018

विना परवानगी मुख्यालय सोडू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


       भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रम-2018 जाहीर झाला आहे. या पोटनिवडणूकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक विषयक कामकाज सुरळीत, सुव्यवस्थीत व जबाबदारीने पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. निवडणूक विषयक अत्यंत महत्वाची कामे मुदतीत पार पाडणे आवश्यक आहे. आपल्या शाखेशी संबंधित विषयांशी वरिष्ठ कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्यास किंवा बैठकीस उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याखेरीज संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडू नये तसेच त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले आहे. सदरची बाब आढळल्यास व त्यामुळे निवडणूकीच्या कामात अडचण किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी जबाबदार राहतील व त्यांचेविरुध्द निवडणूक अधिनियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment