जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 2 May 2018

लोकसभा व विधानसभा पोटनिवडणूक : तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु


          वृ.वि.1952                               12 वैशाख, 1939 (सायं.6.30 वा.)


                                                                                    दि. 2 मे 2018

      मुंबई, दि. 2 : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघ, पालघर लोकसभा मतदार संघ तसेच पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघांच्या पोट निवडणूक 2018 साठी मतदान 28 मे, 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दि.2 जून, 2018 आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यारिता मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे.
        या निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच 3 मे, 2018 ते 2 जून, 2018 पर्यंत कक्ष क्र. 611, निवडणूक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे नियंत्रण कक्ष’ 24x7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र.022-22026441, मोबाईल क्र.9619204746 या क्रमांकावर तक्रार करावी, असे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment