जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 11 May 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : छाननी अंती 24 उमेदवारी अर्ज पात्र


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी आज 11 मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती 24 उमेदवारी अर्ज पात्र ठरले. उमेदवारी अर्ज पात्र ठरलेल्यामध्ये  राष्ट्रीय राज्याचे अधिकृत पक्षाचे उमेदवार मधुकराव यशवंतराव कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हेंमतकुमार श्रावण पटले भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय राज्याचे अधिकृत पक्षाव्यतिकरक्त नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार अक्षय योगेश पांडे विदर्भ माझा पार्टी, गोपाल तुकाराम उईके गोंडवाना गणतंत्र पार्टी, संजय गजानन केवट एकलव्य समाज पार्टी, डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, जितेंद्र आडकु राऊत अखिल भारतीय मानवता पक्ष, धर्मराज रामचंद्र भलावी बहुजन मुक्ती पार्टी, नंदलाल दिक्षीत काडगाये बळीराजा पार्टी, बोरकर राजेश पुरुषोत्तम बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, मडावी लटारी कवडू भारिप बहुजन महासंघ, इतर उमेदवार अजाबलाल तुलाराम अपक्ष, किशोर मनोहर पंचभाई अपक्ष, काशिराम जगन गजबे अपक्ष, चनिराम लक्ष्मण मेश्राम अपक्ष, जायस्वाल विरेंद्रकुमार कस्तुरचंद अपक्ष, झिटू राघोजी दुधकंवर अपक्ष, निर्वाण राजू रामभाऊ अपक्ष, विनोदकुमार मनोहरराव नंदुरकर अपक्ष, पुरुषोत्तम नारायण कावळे अपक्ष, राकेश टेंभरे अपक्ष, राजेश खुशाल कापसे अपक्ष, रामविलास शोभेलाल मस्करे अपक्ष सुहास अनिल फुंडे अपक्ष यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment