जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 10 May 2018

लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 28 नामनिर्देशन पत्र दाखल


आज 21 उमेदवारी अर्ज दाखल
                             104 उमेदवारांनी केली 207 अर्जाची उचल
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 21 उमेदवारांनी 23 अर्ज दाखल केले. यामध्ये  पुरुषोत्तम कावळे अपक्ष, नंदलाल दिक्षीत अपक्ष, मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस-2 अर्ज, नाना पंचबुध्दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-2 अर्ज, मडावी लटारी कवडू अपक्ष, जितेंद्र आडकू राऊत अपक्ष, अजबलाल तुलाराम अपक्ष, गोपाल तुकाराम उईके अपक्ष, संजय गजानन केवट अपक्ष, किशोर मनोहर पंचभाई अपक्ष, अक्षय योगेश पांडे अपक्ष, काशिराम जगन गजबे अपक्ष, राकेश टेंभरे अपक्ष, पंकज दिलीप फुलसुंगे अपक्ष, धरमराज रामचंद्र भलावी अपक्ष, झिटू रघूजी दुधकंवर अपक्ष, केशव गणपतराव बांते अपक्ष, विनोदकुमार मनोहराव नंदूरकर अपक्ष, राजू रामभाऊ निर्वाण अपक्ष, रामविलास शोबेलाल मसकरे अपक्ष, राजेश खुशाल कापसे अपक्ष यांचा समावेश आहे. संजय केवट व मडावी लटारी यांनी यापूर्वीही अर्ज दाखल केला असल्यामुळे आजपर्यंत एकूण 28 नामनिर्देशन पत्र दाखल झाले.
 अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 9 मे रोजी  7 उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात हेंमत पटले भाजपा-2 अर्ज, संजय केवट अपक्ष, मडावी लटारी कवडू अपक्ष, राजेश पुरुषोत्तम बोरकर अपक्ष-3, चनिराम लक्ष्मण मेश्राम-2 अपक्ष व भारतीय शेतकरी कामगार पक्ष, देवराज हरिश्चंद्र बावणकर शिवसेना आणि डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.    
अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी  8 मे रोजी 2 उमेदवारांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात विरेंद्र कुमार जायस्वाल भाजपा व अपक्ष म्हणून तर सुहास अनिल फुंडे यांनी अपक्ष म्हणून  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूकीची अधिसूचना जारी झाल्यापासून म्हणजे 3 मे  पासून 10 मे पर्यंत 104 उमेदवारांनी 207 अर्जाची उचल केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी अर्जाची उचल केली.

No comments:

Post a Comment