जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 11 April 2018

“दिलखुलास” मध्ये सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात दि. ८ ते १४ एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शासनाद्वारे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह (दि. ८ ते १४ एप्रिल) घोषित करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127जयंतीनिमित्त नागपूर येथील दक्षाभूमी व मुंबईतील चैत्यभूमी येथे आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रमइंदू मिलच्या कामकाजाची सद्यस्थिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी सामाजिक चळवळी केल्या त्या स्थळांचे पर्यटन/तीर्थक्षेत्र म्हणून केलेला विकास, समता प्रतिष्ठानाची भूमिका, व्यसनमुक्ती संत साहित्य संमेलन, बौद्ध समाजासाठी व आंतरजातीय विवाहासाठी स्वतंत्र विवाह कायदा, पाली भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ तसेच वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन योजना आदी विषयांची माहिती श्री. बडोले यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment