जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 1 May 2017

सर्वांगीण विकासात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा - पालकमंत्री बडोले

                             महाराष्ट्र स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन







       जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पध्दतीत बदल करावा. शेवटच्या माणसाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबध्द आहोत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलीस कवायत मैदान कारंजा येथे आयोजित करण्यात आला. पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देवून परेडचे निरिक्षण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते.
      जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, उपवनसंरक्षक श्री.युवराज अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. नैसर्गीकदृष्टया असलेल्या या जिल्ह्यात स्थानिकांना पर्यटनासोबत छोट्या-मोठ्या उद्योगातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा जवळपास 6 हजार मागासवर्गीय विद्यार्थीनींना लाभ देण्यात आल्यामुळे ही शिष्यवृत्ती त्यांचेसाठी उपयुक्त ठरली. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीच्या विकासासाठी 11 कोटी 70 लक्ष रुपये निधी देण्यात आल्यामुळे या वस्तीच्या सर्वांगीण विकासाला मदत होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील चार तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
       स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच कामानिमित्त होणारे त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजना जिल्ह्यात उपयुक्त ठरल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, जवळपास 1 लाख 20 हजार कुटुंबांना यातून रोजगारही मिळाला आहे. सोबतच ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहे. स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी करण्यात येत आहे. नुकतेच सडक/अर्जुनी येथे आयोजित कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन मेळाव्यातून त्यांना स्वावलंबनाची दिशा देण्यात आली आहे.
        बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी भागात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, याचा लाभ 454 अंगणवाड्यातील 21 हजार 994 लाभार्थ्यांना देण्यात येत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यात सुधारणा व बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. इंधनासाठी वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी मागील पाच वर्षात जवळपास 14 हजार 250 कटुंबांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी व शेतीची उत्पादकता वाढून शेतकरी समृध्द व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.बडोले यावेळी म्हणाले, कटंगीकला व कलपाथरी हे प्रकल्प जून 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बेवारटोला व ओवारा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मामा तलावाचे खोलीकरण करणे, नविन दोन हजार विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करणे व धापेवाडा उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवती व गरजुंनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
         यावेळी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सोनाली चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश बागडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, लेखा अधिकारी श्री.बावीसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       यावेळी पोलीस कमांडर, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, जिल्हा वाहतूक शाखा, बँड पथक, बिट मार्शल, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, फिरते न्यायवैद्यक पथक, शीघ्र कृती दल, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन पथक यांनी पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मंजुश्री देशपांडे यांनी केले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार
       पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल, स्मार्ट गाव योजनेअंतर्गत पुरस्कार मिळालेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील कोकणा या ग्रामपंचायतीच्या सरपंच लता चांदेवार, उपसरपंच शिवाजी गहाणे, ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसेविका एस.बी.राऊत. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार महेंद्र हेमणे, जिल्हा गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार संजय नागपुरे, जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार वल्लभ शेंडे व भारती बडगे. श्रीमती निलम अवस्थी यांना वेट लिफ्टींगमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल, प्रियंका बैस हिने दुबई येथे मुलींच्या रग्बी अजिंक्य पद स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल, प्राजक्ता रणदिवे शिक्षीका रजेगाव, सुनिल श्रीवास्तव शिक्षक दासगाव, मधुकर नागपुरे मुख्याध्यापक बाकलसर्रा यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अजय पांडे, मेसर्स अपेक्स एक्सपोर्ट्स कॉरपोरेशन, जी.व्ही.एस.प्रसाद, मेसर्स दिव्या मार्केटिंग कंपनी, सर्वेश भुतडा, मेसर्स श्री गणेश ॲग्रो इंडस्ट्रीज, श्रीमती वर्षा लालवानी, मेसर्स यश बेकर्स. गोरेगावचे पोलीस निरिक्षक सुरेश कमद यांनी सेवेत सतत 15 वर्ष उत्तम रेकॉर्ड राखल्याबद्दल. पंकज पांडे, राजेंद्र सोलंकी, रेखलाल गौतम, दिक्षीतकुमार दमाहे, पंकज दिक्षीत या पोलीस कर्मचाऱ्यांचा, तसेच नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक ए.एच.शेख, राजेंद्र भेंडारकर, रिना चव्हाण, ओमप्रकाश जामनीक, रेखा धुर्वे, तीर्थराज बसेने, सुदर्शन वासनिक, गुप्त वार्ता विभागाचे राजा भिवगडे, रोजगार हमी योजना व कॅशलेस गोंदिया यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, आदर्श तलाठी म्हणून सालेकसा तालुक्यातील कोटजंभोराचे तलाठी आर.एच.मेश्राम तसेच सन 2016-17 या वर्षात इडिट मोड्यूल, सात-बारा संगणकीकरणाचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट, तिरोडा तहसिलदार रविंद्र चव्हाण, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगळे तसेच तलाठी शैलेंद्र अंबादे, सुनिल राठोड, विनोद राऊत, एस.बी.मेश्राम, सी.एन.सोनवाने, पी.आर.गजबे, आर.एस.राऊत, मोतीराम पारधी, निखिलेश दंडाळे, विजय तांदळे, श्रीमती आशा हरमकर, जी.बी.हटवार, एम.टी.मल्लेवार, गौरीशंकर गाढवे, अशोक बघेले, ओमेश्वरी येळे, हस्तरेखा बोरकर या तलाठ्यांचा तसेच विविध शासकीय कार्यक्रमात उत्कृष्ट सुत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिका मंजुश्री देशपांडे आणि आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमात उत्कृष्ठ सहभाग नोंदविल्याबद्दल शहीद मिश्रा विद्यालय तिरोडाचे क्रीडा शिक्षक सुनिल शेंडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र व गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment