जिल्ह्यातील विकास कामांना गती
मिळणार
• प्रशासकीय इमारत फर्नीचरसाठी 9 कोटी 36
लाख
• सावंगीत विश्रामगृहासाठी 1 कोटी 81 लाख
• जुनेवाणी प्रकल्पासाठी 1 कोटी 89 लाख
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या बांधकामासाठी यापूर्वीच 449 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय
मान्यता देण्यात आलेली आहे. याशिवाय गोंदिया येथील जी.एन.एम. प्रशाळेच्या
बांधकामासाठी 982 लाख रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री बडोले यांनी
सांगितले.
जुनेवाणी या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील
लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 189 लाख रुपयाची कामे नव्याने मंजूर
करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यात यश आले असून
शासनाने यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांचाही यासाठी मी आभारी
असल्याचे बडोले म्हणाले. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह असो,
तरुणांसाठी स्वयंरोजगारा बाबतचा कौशल्य विकास कार्यक्रम असो की, भारतीय प्रशासकीय
सेवेसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी असो, हवाई सुंदरी पुर्वतयारी
प्रशिक्षण यामध्ये जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment