जिल्ह्याचे पालक सचिव तथा वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय
मुखर्जी यांनी आज 15 जून रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि केटीएस
जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण संचालक पी.टी.वाकोडे, अपर जिल्हाधिकारी
अशोक लटारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे यांची
उपस्थिती होती.
डॉ.मुखर्जी यांनी केटीएस जिल्हा सामान्य
रुग्णालयात असलेल्या सिटी स्कॅन मशीन विभागाला भेट देवून पाहणी केली व नविन येणारे
सिटी स्कॅन मशीन नविन इमारतीत लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानेच बांधण्यात आलेल्या विद्यार्थी वर्ग व वाचन
कक्षाची त्यांनी पाहणी करुन काही उपयुक्त सूचना केल्या. अतिदक्षता विभाग,
टेलिमेडिसीन विभाग, दंतचिकित्सा विभाग, डायलेसीस विभाग, बाह्यरुग्ण विभाग,
आंतररुग्ण विभागाच्या वार्ड 1 व 2 ला भेट देवून रुग्णांशी संवाद साधला. तसेच येथील
कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देवून रुग्णांना
चांगल्याप्रकारची वैद्यकीय सेवा पुरविण्यात यावे असे सांगितले.
बाई
गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला भेट देवून परिसराची पाहणी करुन पावसाळ्याच्या
दिवसात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे करण्यात यावा यासाठी 2 अतिरिक्त मोटरपंप
लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे वार्डामध्ये पावसाळ्यात पाणी जाणार नाही
व रुग्णांचे हाल होणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक
बुधवारी प्रत्यक्ष मुलाखतीतून सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांची पदे भरण्यात
येतात. परंतू या मुलाखतीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब अधिष्ठाता
डॉ.रुखमोडे यांनी सांगितली. बधिरीकरणशास्त्र विभागात 4 डॉक्टरांची पदे भरण्याची
विनंती त्यांनी सचिवांना केली. याबाबत लवकरच निर्णय घेवून पदभरती करण्यात येईल व
स्थानिक पातळीवर सुध्दा भरती प्रक्रिया राबवावी अशी सूचना डॉ.मुखर्जी यांनी
अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांना केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध
विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment