जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 3 March 2018

रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी - आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत



खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण
     लोकसंख्या आणि अंतराच्या निकषावरच वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य संस्थेची स्थापना करण्यात येते. रुग्णांसाठी डॉक्टर हा देव असतो. रुग्णांच्या सेवेची गरज लक्षात घेता त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.
       3 मार्च रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण डॉ.सावंत यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य सर्वश्री गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे, माधुरी पातोडे, शिला चव्हाण, सरिता कापगते, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, पं.स.सदस्य इंदूताई परशुरामकर, सरपंच उर्मिला कंगाले, उपसरपंच टेकराम परशुरामकर यांची उपस्थिती होती.
       डॉ.सावंत म्हणाले, आरोग्य सेवा ही राजकारण विरहित असली पाहिजे ही आपली भूमिका आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील 86 टक्के डॉक्टरांची पदे भरली आहे. यासाठी पालकमंत्री बडोले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील समस्या सोडविण्यात येतील. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या इमारतीच्या भूमिपूजनाची कामे प्रलंबीत असल्यामुळे ही भूमिपूजने पालकमंत्र्यांनी तातडीने करावीत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम त्वरित होण्यास मदत होईल. येत्या सहा महिन्यात सौंदड ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यात येतील. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकही दिवस डॉक्टरविना राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही नविन पध्दतीची आहे. ही इमारत चांगली आणि दर्जेदार व्हावी यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आरोग्य अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आता चांगली वास्तू निर्माण झाल्यामुळे चांगली आरोग्य सेवा देखील आरोग्य विभागाने दयावी असे ते म्हणाले.
       सौंदड ग्रामीण रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री.बडोले म्हणाले, सडक/अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला पाहिजे. आरोग्य सेवा देतांना वैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध झाले पाहिजे. सौंदड ग्रामीण रुग्णालयासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला पाहिजे तसेच या रुग्णालयासाठी नविन इमारत देखील तयार झाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
       यावेळी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करणारे कंत्राटदार विष्णू अग्रवाल यांचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
      खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत ही 894 स्क्वेअर मीटर जागेवर उभारण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे टाईप-1 निवासस्थान 206 स्क्वेअर मीटरवर, टाईप-2 210 स्क्वेअर मीटर, पहिल्या माळ्याचे बांधकाम 210 स्क्वेअर मीटर आणि टाईप-3 चे बांधकाम 210 स्क्वेअर मीटर करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, 14 कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, सुरक्षा भिंत, रस्ते, बोरवेल, विद्युतीकरण, फर्निचर, बगीचा, बायोमेडिकल वेस्ट पीट, गप्पीमासे पैदास केंद्र तयार करण्यात आले आहे. या इमारतीच्या बांधकामावर 4 कोटी 28 लाख 22 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
     प्रारंभी आरोग्य मंत्री डॉ.सावंत, पालकमंत्री बडोले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. आरोग्य केंद्रातील विविध विभागाची पाहणी केली. कार्यक्रमाला खोडशिवणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री.शेंडे यांनी मानले.

1 comment:

  1. हॅलो,

    आपल्या आर्थिक गरजा सोडविण्यासाठी तुम्हाला त्वरित कर्जाची गरज आहे का? आम्ही 2,000.00 ते 100,000,000.00 या दरम्यान कर्ज देऊ करतो, आम्ही विश्वसनीय, शक्तिशाली, जलद आणि गतिमान नाही, क्रेडिट चेक न करता आणि या हस्तांतरणाच्या काळात 100% हमी परदेशी कर्ज देऊ करतो.

        सर्व कर्जांसाठी आणि आगाऊ रक्कम भरल्याशिवाय 3% व्याजदराने आम्ही सर्व चलन कर्जासह जारी केले .... आपल्याला या ईमेलद्वारे आम्हाला परत स्वारस्य असल्यास.


    आम्हाला परत करा, स्वारस्य असल्यास, द्वारे: zekoceanfinance@gmail.com



    विनम्र,

    श्री लन्लाजार मार्कस
    zekoceanfinance@gmail.com

    ReplyDelete