सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध
कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. या योजनांची माहिती तसेच या योजनांचे
यश मांडणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत तयार
केलेल्या सामाजिक न्यायाच्या दिशेने
या 29 मिनिटाच्या माहितीपटाच्या डिव्हिडीचे व महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टर
योजना, कौशल्य विकास योजना आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना या योजनांवर
आधारित वाटचाल समतेची या ऑडिओ-व्हिडिओ
जिंगल्सच्या डिव्हिडीचे विमोचन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री
राजकुमार बडोले यांच्या हस्ते 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले,
संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी
मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी
उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
या
माहितीपटात समता, न्याय व बंधुता या विचारांवर आधारित काम करणाऱ्या सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाच्या अनेक योजना, अभियान व उपक्रमांची माहिती देण्यात आली
आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व
स्वाभिमान योजना, गटई स्टॉल योजना, फुले-शाहू-आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना,
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना व इतर शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह
योजना, निवासी शाळा योजना, बचतगटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना, बार्टीमार्फत स्पर्धा
परीक्षेचे वर्ग, कौशल्य विकास योजना, रमाई घरकूल योजना, कृषि यांत्रिकीकरण योजना,
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, सामुहिक विवाह योजना, थोर समाजसुधारकांचा वसा
पुढे नेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना देण्यात येणारे पुरस्कार,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी योजना, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेले विविध कार्यक्रम,
व्यसनमुक्ती साहित्य संमेलन यासह अन्य योजनांचे व कार्यक्रमांचे यश मांडणाऱ्या
तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध
महामंडळाची माहिती या माहितीपटाद्वारे देण्यात आली आहे.
माहितीपट
व जिंगल्स निर्मितीसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे विशेष आभार मानण्यात येत
असून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,
समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या
माहितीपट व जिंगल्स निर्मितीमुळे जास्तीत जास्त युवक-युवतींना तसेच संबंधित
घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा माहिती
अधिकारी विवेक खडसे यांनी सांगितले.
माहितीपट व जिंगल्स तर तयार झाले पुढे काय?कार्यालयातच राहतील की काही वितरणाची काय व्यवस्था आहे?प्रचार व प्रसारासाठी काय व्यवस्था होईल?की टेबल कॅलेंडर सारखें होईल.
ReplyDelete