जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 23 October 2026

ॲट्रासिटी तपासात वेग हे अभिनंदन; दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याची गरज : अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे

 


           गोंदिया, दि.23 : जिल्ह्यातील ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील तपासाच्या वेगात प्रगती झाली असून दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याकरीता येणाऱ्या अडचणी संबंधित विभागाने प्राथमिकतेने हाताळावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सभेला समाजकल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, विधी अधिकारी मिलिंद चवरे व नागरी हक्क संरक्षण पथकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

           अपर जिल्हाधिकारी श्री. घोरपडे म्हणाले, जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस तपास प्रक्रियेमध्ये वेग आलेला असून हे अभिनंदन आहे. मात्र दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्याचे जाणवते आणि त्यात गती असण्याबाबत त्यांनी पोलीस यंत्रणेने यात अधिक संवेदनशीलपणे तपासणी गरजेचे असल्याचे सांगितले.

            त्यानंतर समिती सदस्य सचिव किशोर भोयर यांनी माहे सप्टेंबर २०२६ अखेर पोलीस विभागाकडून प्राप्त एकूण गुन्ह्यांची स्थिती, पोलीस तपासावरील गुन्ह्यांची स्थिती, पोलीस फायनल गुन्ह्यांची स्थिती, न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांची स्थिती व अर्थसहाय्याकरिता प्रलंबित गुन्ह्यांची स्थिती सभेसमोर सादर केली. सन २०२६-२७ आर्थिक वर्षामध्ये माहे सप्टेंबर २०२६ अखेर खून-4. खुनाचा प्रयत्न-0, बलात्कार-3, विनयभंग-2, मारहाण/गंभीर दुखापत-2, जाळपोळ-0, जातिवाचक शिवीगाळ-10 व इतर-6, असे एकूण 27 गुन्हे घडलेले आहेत. त्यापैकी 18 अनुसूचित जाती व 9 अनुसूचित जमातीचे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. पोलीस फायनल 1, कोर्टात दाखल 19, न्यायालयात 19 अशी माहिती बैठकीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री. भोयर यांनी बैठकीत दिली.

                                                                                    0000000

 

      

No comments:

Post a Comment