जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 7 October 2026

रेती वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध : अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश


गोंदिया, दि.7 : रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डांगोर्ली, किन्ही आणि तेढवा येथील रेतीघाटांमधून गोंदिया शहराकडे ये-जा करणाऱ्या जड-अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची तसेच वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी निर्बंध लागू केले आहेत.

मोटार वाहन अधिनियम, 1988 मधील कलम 115 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित मार्गावरून रेती वाहतूक करणाऱ्या 6 चाकी, 10 चाकी व 12 चाकी टिप्पर तसेच अन्य जड-अवजड वाहनांना सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुकीस बंदी राहणार आहे. हा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.
डांगोर्ली, किन्ही व तेढवा येथून दासगाव-निलज-पांढराबोडी मार्गे गोंदियाकडे ये-जा करणाऱ्या जड-अवजड वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या निर्बंधांचा उद्देश आहे.
00000000

No comments:

Post a Comment