जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Tuesday, 6 October 2026
“ध्येय निश्चित करा, रोल मॉडेल ठरवा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा” - प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर
गोंदिया, दि.6 : राणी दुर्गावती जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरीचे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह भविष्यातील ध्येयांबाबत मार्गदर्शन केले.
राणी दुर्गावती जयंतीनिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व व नृत्य सादरीकरण करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याचे कौतुक करत प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर म्हणाले, “आपले ध्येय निश्चित करा, त्या क्षेत्रातील आपले रोल मॉडेल ठरवा आणि त्या दिशेने पुढे जा, तेव्हाच तुम्हाला भविष्यात यश मिळेल.” विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. तसेच पुराडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित संस्थांमध्ये जावे, अशी अपेक्षाही प्रकल्प अधिकारी इसोकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी परिश्रम, शिस्त आणि सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्राचार्य के. बी. कापसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्णा थप्पे, उपाध्यक्ष संगिता उईके, अधीक्षक सोनुले, महिला अधीक्षक जोशी यांच्यासह बचत गटांमधील महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नेनावत यांनी केले
0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment