जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 15 October 2026

उषाकिरण आत्राम यांचा ‘अहेर’ कथासंग्रह इंग्लिशमध्ये अनुवादित

 




गोंदिया, दि.15 : कचारगड येथील ज्येष्ठ साहित्यकार उषाकिरण आत्राम ताराम यांचा मराठीतल्या ‘अहेर’ कथासंग्रहाचे इंग्लिशमध्ये अनुवाद केलेले पुस्तक नुकतेच त्यांना मिळाले.  या कथासंग्रहातील बाजा, भुक अहेर या गाजलेल्या कथा अनेक विध्यापिठातील अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, यातील  कथा गोंडी, मराठी, हिन्दी, बंगाली मध्येही अनुवाद झालेल्या आहेत आणि आता इंग्लिशमध्ये अनुवाद प्राध्यापिका रेणुका रॉय, सेठ केशरीमल पोरवाल कॉलेज कामठी, नागपूर विद्यापीठ यांनी केलेला आहे. यापूर्वी लेखणीच्या तलवारी काव्यसंग्रहाचे इंग्लिश अनुवाद सुध्दा प्रा. रेणुका रॉय यांनी केलेला आहे.

उषाकिरण आत्राम चे मोट्यारिन, लेखणीच्या तलवारी काव्यसंग्रह इंग्लिश व हिंदीतुन अनुवाद झालेले आहे. तसेच लवकरच अहेर कथासंग्रह हिंदीतुन प्रकाशित होण्याच्या वाटेवर असून शब्दशस्त्र काव्यसंग्रहाचे इंग्लिश अनुवाद करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या या यशाबद्दल अनेक साहित्यकार मित्रांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलेले आहे.

                                                                0000000

No comments:

Post a Comment