जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 12 October 2026

थकीत कर्जाच्या एकरकमी परतफेडीवर व्याजात 50 टक्के सवलत


इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची OTS योजना; थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

            गोंदिया, दि.12 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थकीत कर्जदार लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (वन टाइम सेटलमेंट – OTS) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जाच्या रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.

            महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, काही लाभार्थ्यांकडे कर्जाची थकबाकी असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा थकबाकीदार लाभार्थ्यांना कर्ज परतफेडीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने एकरकमी परतावा योजना सुरू केली आहे.

            या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी संपूर्ण थकीत कर्जाच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास त्यांना थकीत व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना थकीत कर्जाचा निपटारा करून कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

            तरी महामंडळाच्या सर्व थकबाकीदार लाभार्थ्यांनी निर्धारित कालावधीत या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली थकीत कर्ज प्रकरणे निकाली काढून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विशाखा फडणवीस यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment