गोंदिया, दि. 19 : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स व उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ हा उपक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) मार्फत नागपूर येथील खापरी मेट्रो रेल्वेस्टेशन परिसरातील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), नागपूर येथे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावरील आयोजन व समन्वयासाठी IIM नागपूर या संस्थेचे सहकार्य घेण्यात येत आहे.
सदर सत्रात उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी व संबंधित प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत संबंधित भागधारकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
तरी गोंदिया जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या जनजागृती उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवावी व सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment