भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी आज 11 मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती 24 उमेदवारी अर्ज पात्र ठरले. उमेदवारी अर्ज पात्र ठरलेल्यामध्ये राष्ट्रीय व राज्याचे अधिकृत पक्षाचे उमेदवार मधुकराव यशवंतराव कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हेंमतकुमार श्रावण पटले भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय व राज्याचे अधिकृत पक्षाव्यतिकरक्त नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार अक्षय योगेश पांडे विदर्भ माझा पार्टी, गोपाल तुकाराम उईके गोंडवाना गणतंत्र पार्टी, संजय गजानन केवट एकलव्य समाज पार्टी, डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, जितेंद्र आडकु राऊत अखिल भारतीय मानवता पक्ष, धर्मराज रामचंद्र भलावी बहुजन मुक्ती पार्टी, नंदलाल दिक्षीत काडगाये बळीराजा पार्टी, बोरकर राजेश पुरुषोत्तम बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, मडावी लटारी कवडू भारिप बहुजन महासंघ, इतर उमेदवार अजाबलाल तुलाराम अपक्ष, किशोर मनोहर पंचभाई अपक्ष, काशिराम जगन गजबे अपक्ष, चनिराम लक्ष्मण मेश्राम अपक्ष, जायस्वाल विरेंद्रकुमार कस्तुरचंद अपक्ष, झिटू राघोजी दुधकंवर अपक्ष, निर्वाण राजू रामभाऊ अपक्ष, विनोदकुमार मनोहरराव नंदुरकर अपक्ष, पुरुषोत्तम नारायण कावळे अपक्ष, राकेश टेंभरे अपक्ष, राजेश खुशाल कापसे अपक्ष, रामविलास शोभेलाल मस्करे अपक्ष व सुहास अनिल फुंडे अपक्ष यांचा समावेश आहे.
जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Friday, 11 May 2018
Thursday, 10 May 2018
लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 28 नामनिर्देशन पत्र दाखल
आज 21 उमेदवारी
अर्ज दाखल
104
उमेदवारांनी केली 207 अर्जाची उचल
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ
पोट निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 21 उमेदवारांनी 23 अर्ज दाखल
केले. यामध्ये पुरुषोत्तम कावळे अपक्ष, नंदलाल
दिक्षीत अपक्ष, मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस-2 अर्ज, नाना पंचबुध्दे राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टी-2 अर्ज, मडावी लटारी कवडू अपक्ष, जितेंद्र आडकू राऊत अपक्ष, अजबलाल
तुलाराम अपक्ष, गोपाल तुकाराम उईके अपक्ष, संजय गजानन केवट अपक्ष, किशोर मनोहर पंचभाई
अपक्ष, अक्षय योगेश पांडे अपक्ष, काशिराम जगन गजबे अपक्ष, राकेश टेंभरे अपक्ष, पंकज
दिलीप फुलसुंगे अपक्ष, धरमराज रामचंद्र भलावी अपक्ष, झिटू रघूजी दुधकंवर अपक्ष, केशव
गणपतराव बांते अपक्ष, विनोदकुमार मनोहराव नंदूरकर अपक्ष, राजू रामभाऊ निर्वाण अपक्ष,
रामविलास शोबेलाल मसकरे अपक्ष, राजेश खुशाल कापसे अपक्ष यांचा समावेश आहे. संजय केवट
व मडावी लटारी यांनी यापूर्वीही अर्ज दाखल केला असल्यामुळे आजपर्यंत एकूण 28 नामनिर्देशन
पत्र दाखल झाले.
अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 9 मे रोजी 7 उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
यात हेंमत पटले भाजपा-2 अर्ज, संजय केवट अपक्ष, मडावी लटारी कवडू अपक्ष, राजेश पुरुषोत्तम
बोरकर अपक्ष-3, चनिराम लक्ष्मण मेश्राम-2 अपक्ष व भारतीय शेतकरी कामगार पक्ष, देवराज
हरिश्चंद्र बावणकर शिवसेना आणि डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
यांचा समावेश आहे.
अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी 8 मे रोजी 2 उमेदवारांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले
आहे. यात विरेंद्र कुमार जायस्वाल भाजपा व अपक्ष म्हणून तर सुहास अनिल फुंडे यांनी
अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
आहे. निवडणूकीची अधिसूचना जारी झाल्यापासून म्हणजे 3 मे पासून 10 मे पर्यंत 104 उमेदवारांनी 207 अर्जाची
उचल केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी अर्जाची उचल केली.
विना परवानगी मुख्यालय सोडू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
भंडारा-गोंदिया
लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रम-2018 जाहीर झाला आहे. या पोटनिवडणूकीच्या
कार्यक्रमानुसार निवडणूक विषयक कामकाज सुरळीत, सुव्यवस्थीत व जबाबदारीने पार
पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात
आल्या आहे. निवडणूक विषयक अत्यंत महत्वाची कामे मुदतीत पार पाडणे आवश्यक आहे. आपल्या
शाखेशी संबंधित विषयांशी वरिष्ठ कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्यास किंवा
बैठकीस उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या
निदर्शनास आणून दिल्याखेरीज संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडू नये
तसेच त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे निर्देश जिल्हाधिकारी
अभिमन्यू काळे यांनी दिले आहे. सदरची बाब आढळल्यास व त्यामुळे निवडणूकीच्या कामात
अडचण किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व त्यांच्या अधिनस्त
कर्मचारी जबाबदार राहतील व त्यांचेविरुध्द निवडणूक अधिनियमानुसार कार्यवाही प्रस्तावित
करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक-2018 निवडणूक निरिक्षक भंडाऱ्यात दाखल
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक श्री. एन. बी. उपाध्याय, श्री. शफुल हक व श्री. तेजपाल सिंग फुल्का हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. निवडणूक निरिक्षकांचा मुक्काम शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे राहणार आहे.
निवडणूक निरिक्षक सकाळी 10 ते 11 पर्यंत भंडारा येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिक आपल्या तक्रारी व समस्या त्यांना उपरोक्त वेळात प्रत्यक्ष भेटून सांगू शकतात. तसेच निवडणूक निरिक्षक यांचे मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. श्री. एन. बी. उपाध्याय 09978406985, श्री. शफुल हक 09471005988 व श्री. तेजपाल सिंग फुल्का 09872511105. इतर वेळेत नागरिक आपल्या तक्रारी व समस्या मोबाईलवर सुद्धा सांगू शकतात. निवडणूक निरिक्षक श्री. तेजपाल सिंग फुल्का हे शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे मुक्कामी असणार आहेत. ते सकाळी 10 ते 11 पर्यंत गोंदिया येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
निवडणूक निरिक्षक भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्हयाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदान केंद्राची पाहणी करतील. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. या दौऱ्यात सुद्धा निवडणूक निरिक्षक यांना भेटून नागरिक संवाद साधू शकतात.
Wednesday, 9 May 2018
मुरदोलीच्या रोपवाटिकेत 2 लाख 72 हजार विविध प्रजातीचे स्वदेशी रोपटे तयार
स्वदेशी
वृक्ष लागवडीला मिळणार चालना
वाढत्या
जागतिक तापमानामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन
राखण्यासाठी वनांचे अर्थात वृक्षांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. राज्यात जास्तीत
जास्त क्षेत्र वृक्ष लागवडीखाली यावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग
म्हणून येत्या पावसाळ्यात राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात
येणार आहे. 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी विविध
ठिकाणी रोपवाटिकेतून रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात येत्या
पावसाळ्यात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 31 लक्ष विविध प्रजातीचे
रोपटे लावण्यात येणार आहे.
वन
विभागाने रोपटे निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून गोरेगाव तालुक्यातील मुरदोली
येथील वन विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत रोजगार हमी
योजनेतून 2 लाख 72 हजार 115 विविध प्रजातीच्या रोपट्यांची निर्मिती केली आहे.
विशेषकरुन या रोपवाटिकेत स्वदेशी रोपट्यांची लागवड करण्यात आलेली आहे. स्वदेशी
रोपटे लागवड करण्यामागचा उद्देश वन्यपक्षी व प्राण्यांना या झाडांचे फळ खाद्य म्हणून
त्यांच्या अन्नसाखळीचा भाग होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षांना विविध
प्रजातींच्या झाडांची मधुर फळे चाखायला मिळणार आहेत.
जिल्हाधिकारी
अभिमन्यू काळे यांनी स्वदेशी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यात
मोठ्या प्रमाणात विविध रोपवाटिकेत स्वदेशी वृक्षांची रोपटे तयार करण्यात आली आहे.
मुरदोली येथील रोपवाटिकेत साग-79784, बांबू-12366, हिरडा-2000, बेल-4260,
खैर-5220, आवळा-470, मोह-4780, सिवन-9510, कडूलिंब-2870, शिसू-25810, कवट-7280,
आंजन-10680, बिजा-10, जांभूळ-21140, सिताफळ-12280, पुत्रजिवा-70, चिंच-1000,
बेहडा-11395, पारसपिंपळ-9790, सिंदूर-3320, सिसम-2700, अमलतास-8810, रिठा-510,
चिचवा-1770, पांढरा सिरस-5480, करु-170, मोहई-2300, आपटा-740, वड-3400, पिंपळ-760,
आंबा-1810, चारोळी-10, साजा-1370, बादाम-180, गुलमोहर-580, अशोक-710, गराडी-70,
कोजब-540, उंबर-20, तेंदू-20, सावर(काटेरी)-390 अशा एकूण 2 लाख 72 हजार 115 विविध
प्रजातीच्या रोपट्यांची निर्मिती या रोपवाटिकेत करण्यात आली आहे.
विशेषत:
मुरदोली येथील रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी हार्डलिंग चेंबर, मिस चेंबर, लोखंडी
स्टँड, रुट ट्रेनर ब्लॉक इत्यादी साहित्याचा वापर करुन बियाण्यांचे 100 टक्के
अंकुरण करण्यात आले आहे. या रोपवाटिकेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वड-3400,
पिंपळ-760 असे एकूण 4160 रोपे तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत भविष्यात
अधिकाधिक रोपे तयार करण्यात येणार आहे. दुर्मिळ वनस्पती व नामशेष होणाऱ्या
वनस्पतींच्या बियांपासून करु व तेंदूची रोपे तयार करण्यात येत आहे. बिबा, चारोळी,
पिंपळ, वड, उंबर यांची रोपटे देखील तयार करण्यात येत असल्यामुळे जैविक विविधता उपलब्ध
तर झाली आहेच सोबतच पर्यावरणपुरक वातावरण देखील तयार झाले आहे. वनातील विविध
प्रजातीच्या वृक्षांच्या बिया एकत्र करुन या रोपवाटिकेत विविध प्रजातीची रोपटे
तयार करण्यात येत आहे.
2
लाख 72 हजार 115 रोपट्यांची निर्मिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेतून करण्यात आल्यामुळे रोपवाटिकेच्या परिसरातील ग्रामस्थांना रोजगार देखील
उपलब्ध झाला आहे. उपवनसंरक्षक एस.युवराज व सहायक वनसंरक्षक एन.एच.शेंडे यांच्या
कुशल मार्गदर्शनात या रोपवाटिकेतून मोठ्या प्रमाणात भविष्यात स्वदेशी वृक्षांची
रोपटे तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषि, सामाजिक वनीकरण, वन विभाग
यासह अन्य विभागाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या रोपवाटिकेतून स्वदेशी
रोपट्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे वन्यजीवांसाठी खाद्य
उपलब्ध होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा आता होणार 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा'
गोरेगाव
येथील शहीद जाम्या तिम्या शाळेचा समावेश
राज्यातील विद्यार्थ्यांना
एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम
शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,
आदिवासी
विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण
विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा
निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोरेगाव येथील शहीद जाम्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश आहे.
जून 2018 या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्यावतीने
सरकारी शाळातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस
आंतरराष्ट्रीय शाळांची’ सुरुवात करण्यात येणार असून
जून महिन्यापासून राज्यातील 13 तर पुढील शैक्षणिक
वर्षापासून 100 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक
दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. आपली शाळा आंतरराष्ट्रीय शाळेच्या निकषात
येण्यासाठी राज्यातील शाळांना अर्ज करण्यासाठी विद्या प्राधिकरण, पुणे मार्फत ऑनलाईन लिंक देण्यात आली होती. यानुसार 28 नोव्हेंबर 2017 अखेर एकूण 378 शाळांनी अर्ज केले होते. त्यामधून जिल्हास्तरीय निवड समितीद्वारे
ऑनलाईन लिंक भरलेल्या शाळांमधून एकूण 109 शाळांची नामांकने
प्राप्त झाली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाची शाळा म्हणून मान्यता
मिळण्यासाठी राज्यस्तरावर निवडप्रक्रिया घेण्यात आली होती. या निवड परिषदेत
सहभागी एकूण 106 शाळांमधून निवड प्रक्रियेत
उत्कृष्ट कामगिरी असलेली व रुब्रीक्स नुसार प्रत्येक विभागातून पात्र असणाऱ्या
खाली नमूद शाळांची ओजस शाळा म्हणून शिफारस करण्यात आली. शिक्षण आयुक्त यांच्या
अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेल्या खाली नमूद 13 शाळांना ‘ओजस
आंतरराष्ट्रीय शाळा’ म्हणून मान्यता देण्यात आली
आहे.
या असतील ओजस आंतरराष्ट्रीय
शाळा
• अमरावती विभागातील बुलढाणा
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरखेड.
• वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.
• औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद
जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथील जिल्हा परिषद प्रशाळा.
•परभणी जिल्ह्यातील माळीवाडा येथील
पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.
• कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील
खरेदी नं.1 येथील शहापूर तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चराठे नं. 1 येथील सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
• नागपूर विभागातील चंद्रपूर
जिल्ह्यातील चिंचाळा येथील चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा.
• गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील शहीद जाम्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.
• नाशिक विभागातील नंदुरबार
जिल्ह्यातील तोरणमाळ येथील धडगाव तालुक्यातील आंतरराष्ट्रीय निवासी शाळा.
• नाशिक जिल्ह्यातील भोयेगांव येथील
चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
• पुणे विभागातील कोल्हापूर
जिल्ह्यातील खानापूर येथील भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर.
• पुणे जिल्ह्यातील वाबळे वाडी येथील
शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
• सातारा जिल्ह्यातील बोपर्डी येथील
वाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा.
आंतरराष्ट्रीय स्तरावर
शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हाँगकाँग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून आणि समृद्ध
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व प्रभावी अध्ययन संसाधने यांची उपलब्धता करण्यात येणार
आहे. पहिल्या टप्प्यातील 13 ‘ओजस’ शाळांची निवड झालेली असून या शाळा मार्गदर्शक म्हणून काम
करण्यासाठी तयार होतील. या शाळांमधील शिक्षकांना
पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रायोगिक पथदर्शी चाचणी घेऊन
इयत्ता पहिली ते तिसरीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. टप्प्याटप्प्याने सर्व
वर्गांचा अभ्यासक्रम तयार होत आहेत. या शाळांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र व
स्वायत्त ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ तयार केले आहे. ज्ञानाधिष्ठित, समाजाभिमुख, एकविसाव्या शतकाकरिता कौशल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम
निर्मिती केली आहे.आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांसाठी एक समिती गठित
करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली आहे. Local to Global आणि Known to Unknown या ध्येयावर या
शाळांचे काम सुरु राहणार आहे. एनसीईआरटी आणि एससीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा विचार
करुन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने ज्ञान, अभिवृत्ती, उपयोजना, कौशल्य आणि सवयी या 5 प्रमुख
आधारस्तंभावर आधारित असणार आहे. या अभ्यासक्रमात साक्षरता, वाचन, लेखन, संभाषण, श्रवण, गणन, वित्त, कला, शारीरिक शिक्षण आणि पर्यावरणशास्त्र या
विषयांचा समावेश प्रस्तावित आहे.येत्या जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या 13 शाळांसाठी 70 शिक्षकांची निवड करण्यात आली
असून त्यांना सलग 22 दिवसांचे दर्जेदार प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवडण्यात आलेल्या 13 शाळा या जिल्हा परिषदेच्याच मराठी माध्यमांच्या शाळा असून
मराठीबरोबरच इंग्रजी आणि अन्य विषयांचे प्रभुत्व वाढविण्यावर या शाळांमध्ये भर
देण्यात येणार आहे.
Wednesday, 2 May 2018
लोकसभा व विधानसभा पोटनिवडणूक : तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु
वृ.वि.1952 12 वैशाख, 1939 (सायं.6.30 वा.)
दि. 2 मे 2018
मुंबई, दि. 2 : भंडारा-
गोंदिया लोकसभा मतदार संघ, पालघर
लोकसभा मतदार संघ तसेच पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघांच्या पोट निवडणूक 2018 साठी मतदान 28 मे, 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा
दि.2 जून, 2018 आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यारिता मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे.
या निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध
झाल्यापासून म्हणजेच 3 मे, 2018 ते 2 जून, 2018 पर्यंत कक्ष क्र. 611, निवडणूक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजला, मंत्रालय
विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे ‘नियंत्रण कक्ष’ 24x7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करावयाची
असल्यास नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र.022-22026441, मोबाईल क्र.9619204746 या
क्रमांकावर तक्रार करावी, असे उप
सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
००००
Subscribe to:
Posts (Atom)

