जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Wednesday, 23 September 2026
अनंत चतुर्दशीला
गोंदियात
विविध ठिकाणी होणार गणरायाचे विसर्जन
गोंदिया, दि. 23 : अनंत
चतुर्दशीच्या निमित्ताने शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक
तसेच घरगुती गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी
जिल्ह्यातील विविध तलाव, नदीघाट व जलस्रोत निश्चित करण्यात आले आहेत.
गोंदिया शहरातील छोटा गोंदिया
तलाव, भीमघाट पांगोली नदी, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव (रेल्वे) आणि मुर्री तलाव
येथे गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गोंदिया ग्रामीण भागातील खमारी तलाव व
टेमणी घाट (पांगोली नदी), रामनगर भागातील बांधतलाव सूर्याटोला, हिवरा गाव तलाव व
टेमणी नदी घाट, तसेच रावणवाडी क्षेत्रातील कोरणी-रजेगाव नदीघाट येथेही विसर्जनाची
व्यवस्था करण्यात आली आहे.
आमगाव भागातील संत तुकडोजी तलाव,
गायत्री मंदिर तलाव व बाघ नदी घाट, गोरेगाव क्षेत्रातील पवन तलाव व पांगोली नदी
घाट, सालेकसा भागातील रोंढा नाला व साखरीटोला गाव नाला, तसेच देवरी क्षेत्रातील
धुकेश्वरी मंदिर तलाव व गाव तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे.
डुग्गीपार भागातील चुलबंद नदी घाट
व गाव तलाव, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील महागाव तलाव व अर्जुनी मोरगाव गाव तलाव,
नवेगावबांध तलाव, तिरोडा भागातील शिंगाडा तलाव, काशीघाट (गराडाटोला), खामतलाव व
गिरजाबाई शाळेजवळील तलाव, तसेच गंगाझरी क्षेत्रातील कवलेवाडा, पांगळी, मुंडीपार व
एकोडी तलाव येथेही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या
संख्येने भाविक तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जन सायंकाळी व
रात्रीच्या वेळी होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच वाहतुकीस अडथळा
निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत.
विसर्जनस्थळी विद्युत प्रकाश
व्यवस्था, बॅरिकेट्स, बोधचिन्हे व सूचना फलक लावण्यासोबतच सीसीटीव्ही आणि क्रेनची
व्यवस्था करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब
बेहेरे यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून
गणरायाचे विसर्जन शांततेत व सुरक्षितपणे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment