जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 16 September 2026

गोंदिया जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील चार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती मंजूर

 





गोंदिया, दि.16 : अल्पसंख्याक विकास विभागाच्या दि.10 सप्टेंबर 2026 च्या शासन निर्णयान्वये, राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी योजना सन 2026-27 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 4 अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांची परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे. सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गृहचौकशी करुन तसा अहवाल शासनास सादर करण्याकरीता जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.
*निवड झालेले विद्यार्थी* :
1) मंशुर रेहमान इस्माईल पठान, सुर्याटोला गोंदिया याची डाटा एनॉलिसीस या विषयासाठी ब्रिस्टॉल विद्यापीठ युनायटेड किंगडम येथे, 2) मोहम्मद अबुबकर सलिम अंसारी, सुर्याटोला गोंदिया याची आर्टिफिसीयल इंटेलिजन्स या विषयासाठी ब्रिस्टॉल विद्यापीठ युनायटेड किंगडम येथे, 3) प्रशांत संजय राहुलकर, कुंभारे नगर गोंदिया याची ॲग्रीकल्चर या विषयासाठी सिडनी विद्यापीठ न्यु साऊथ वेल्स ऑस्ट्रेलिया येथे, 4) पियुष महेंद्रकुमार धमगाये, फुलचूर टोला, गोंदिया याची कॉमर्स या विषयाकरीता सिडनी विद्यापीठ न्यु साऊथ वेल्स ऑस्ट्रेलिया येथे परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे.
सदर विद्यार्थ्यांना अनुज्ञेय शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी आयुक्त, अल्पसंख्याक आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
शासन निर्णयानुसार परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या संबंधित विद्यार्थ्यांची गृहचौकशी त्यांचे पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आल्यानंतर तसा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह परिपूर्ण गृहचौकशी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनी दिलेली आहे.
00000000

No comments:

Post a Comment