गोंदिया,
दि.30 : भारत सरकारद्वारे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)
व्हीबी जी राम जी अधिनियम 2025 मंजूर केले असून, सदर अधिनियम सद्यस्थितीत
अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम
(MGNREGA) एैवजी अस्तीत्वात येत असून दि.1 जुलै 2026 पासून राज्यात सर्वत्र
अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दि.2 जुलै रोजी जिल्हास्तरीय
जनसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात भारत सरकारद्वारे
विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) व्हीबी जी राम जी अधिनियम 2025
मंजूर केले असून गोंदिया तालुक्यात ग्रामपंचायत सावरी या ग्रामपंचायतीची निवड
करण्यात आली असून वृक्ष लागवड या कामाचे दि.2 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी मंदार
पत्की यांच्या हस्ते सावरी येथे वृक्षारोपण होणार आहे. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो)
भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment