गोंदिया,
दि.22 : जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांचे वतीने बुधवार दि.24 जून 2026 रोजी
सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत कार्यशाळा तथा पेंशन समाधानचे आयोजन जिल्हा
नियोजन व विकास समितीचे सभागृह (DPDC Hall), जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे
आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आहरण व संवितरण अधिकारी (DDOs) यांचेसाठी E- GPF
प्रणाली तसेच E- REVISION PENSION CASES (सुधारित प्राधिकारपत्र) हे विषय घेण्यात
येतील. तसेच पेंशन अदालतीत निवृत्तीवेतन धारकांसाठी पेंशनर समाधान तसेच
निवृत्तीवेनधारक यांच्या समस्यांचे निराकरण कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार
कार्यालय, गोंदिया यांचेकडून करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील
सर्व निवृत्तीवेतन धारकांनी बुधवारी गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित
राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मोहम्मद तौसिफ हसीन तसेच अप्पर कोषागार
अधिकरी (निवृत्तीवेतन) गोंदिया यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment