जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 19 June 2026

अमृततर्फे युपीएससी मुख्य परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी अर्थसहाय्य : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे

 

गोंदिया, दि.19 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) उमेदवारांना 'संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पुर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य (सन 2026-27) योजना राबविण्यात येत आहे.

सन 2026-27 मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचे पालन करावे.

सदर योजनेविषयी भविष्यातील सर्व माहिती/सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी 50 हजार रुपये व मुलाखतीच्या पुर्वतयारीसाठी 25 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

सदर योजनेसाठी ऑनलाईन/संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2026 आहे. अधिक माहितीसाठी 9112228776 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक ‘अमृत’ गोंदिया कार्तिक तिवारी यांनी कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment