जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 19 June 2026

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी योग कार्यक्रमाचे आयोजन

 


गोंदिया, दि.19 : "निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing)" या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार दि.21 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी सामुहिक योग प्रात्यक्षिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्हा प्रशासन व नगर योग उत्सव समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जून 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता इंदिरा गांधी स्टेडियम (नगरपरिषद), गोंदिया येथे सामुहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत (MY Bharat), भारत स्काऊट अॅन्ड  गाईड, जिल्हा क्रीडा संघटना, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, आंतरराष्ट्रीय नेचरोपॅथी संघटना, सूर्या फाउंडेशन तसेच दिव्यांग योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जून रोजी सकाळी 7.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे भव्य सामुहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, क्रीडा संस्था, योग संस्था व सामाजिक संस्थांनी आपल्या स्तरावरही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करून जास्तीत जास्त वि‌द्यार्थी, खेळाडू व नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, योगप्रेमी, खेळाडू, युवक-युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व नागरिकांनी इंदिरा गांधी स्टेडियम (नगरपरिषद), गोंदिया येथे सकाळी 6.30 वाजता आयोजित कार्यक्रमास तसेच जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे सकाळी 7.00 वाजता आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

                                                   0000000

No comments:

Post a Comment