जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 18 June 2026

निरोगी वृद्धत्वासाठी योग : गोंदियात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होणार

 


गोंदिया, दि.18 : निरोगी आणि सशक्त वृद्धत्वासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर यंदाचा 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार असून 2015 पासून या उपक्रमाला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी रविवार, दि. 21 जून 2026 रोजी हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातही या निमित्ताने विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिके, सामुहिक योग सत्रे आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसी, पोलीस विभाग, योग संस्था तसेच मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग राहणार आहे.

योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. विशेषतः वृद्धत्वासाठी योग हा निरोगी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग ठरत असून या माध्यमातून त्यांना तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यास सहाय्य होते.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, योगच्या माध्यमातून निरोगी जीवनाची दिशा स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                                                    00000000

No comments:

Post a Comment