सांगली येथे दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक
प्रशिक्षण
गोंदिया, 23: महाराष्ट्र
शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली
अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग
प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना
महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई ची शासन मान्यता
आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे.
सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा
असल्याने त्वरीत संपर्क साधा.
प्रवेशासाठी नियम अटी व सवलती
१. अभ्यासक्रमाचे नांव
अ) सर्टिफिकेट इन कॉम्युटर
ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स)
ब) मोटार अँड आर्मेचर
वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)
शैक्षणिक पात्रता
किमान इ. ८ वी पास
किमान इ. ९ वी पास
२. वयोमर्यादा : 16 ते 40
वर्ष
३. प्रशिक्षण कालावधी : 1
वर्ष
४. फक्त दिव्यांग मुलांनाच
प्रवेश दिला जातो.
५. सोई व सवलती
> प्रशिक्षण कालावधीत
राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय
> अद्यावत व परीपूर्ण
संगणक कार्यशाळा
> भरपूर प्रॅक्टीकल्स व
व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण
> नेटवकींग व इंटरनेटची
सुविधा
> अनुभवी व तज्ञ निदेशक
> उज्वल यशाची परंपरा
> समाज कल्याण
विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना
६. अर्ज केंव्हा, कसे व कोठे करावेत
( प्रवेश अर्ज व
माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी
रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड: 416 410 नंबर
0233-2222908 मोबाईल 9922577561,9325555981 या पत्यावर पोस्टा व्दारे किंवा समक्ष
मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे
भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा
सोडल्याचा दाखला, SSC मार्कशिट व प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड, Domicile प्रमाणपत्र व
उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे
पाठवावेत, प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश
देण्यात येईल.
तरी माफक जागा असल्याने
गरजू दिव्यांगाना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधा, ग्रामीण व
शहरी भागातील लोकांना आवाहन करणेत येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात
असलेल्या गरजू दिव्यांगाना या शासकीय योजनेची माहिती करुन द्यावी असे आवाहन शासकीय
प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment